.. शहीद ॲड. कामरेड गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना शिक्षा द्या !! "कम्युनिस्ट पक्षाचे धरणे आंदोलन".
चोपडा, बातमीदार ..भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते व महाराष्ट्रातील ख्यातनाम डावे विचारवंत शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहून जगाला छत्रपती शिवरायांचे विचार व धोरणे परिचित केली.
रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या सहकार्यांमध्ये मुस्लिम सहकारी यांचाही फार मोठा वाटा होता. आजपर्यंतच्या परंतु इतिहासामध्ये लिहिलेल्या मुस्लिम सहकाऱ्यांना वगळून शिवाजी महाराजांवर अफजलखान वधाचे वेळी तलवार घेऊन धावून येणाऱ्या कृष्णा कुलकर्णी याचे नाव जगात इतिहासात अधोरेखित न करता केवळ चुकीचे चरित्र प्रचलित केले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवरायांचे छोटेसे *शिवाजी कोण होता* हे पुस्तक लिहून त्यात शिवरायांची खरी बाजू मांडली म्हणून १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सनातनी कर्मठ विचाराच्या लोकांनी त्यांची हत्या केली. चोपडा तालुका कम्युनिस्ट पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलनात मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी भाकपचे नेते अमृत महाजन, जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, शेतमजूर युनियनचे नेते गोरख वानखेडे, यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी नायब तहसीलदार महेश यांना जे निवेदन सादर करण्यात आले त्यात म्हटले आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे हे महाराष्ट्रात संविधानाला मान्य असलेली धर्मनिरपेक्षता समाजवाद विचारांचा आयुष्यभर जागर करून श्रमिक जनतेसाठी त्यांचे कार्य सुरू होते. याचे वाईट वाटून त्यांना सनातनी कर्मठ विचाराच्या लोकांनी त्यांची हत्या केली. त्या हत्या करणाऱ्यांना हत्या होऊन सहा वर्षे लोटली.
तरीदेखील गुन्ह्याचा तपास होऊन आरोपींना शिक्षा झालेली नाही, तरी या संदर्भात शहीद गोविंद पानसरे यांच्या खुनाचा खटला त्वरित उभा करून तो चालवण्यात यावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती, त्यासाठी २०/२/२२ रोजी तहसीलदार कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात भाकप कॉम्रेड बाळू लोहार, वाल्मीक मैराले, रमेश कोळी, दीपक कोळी, इरफान मणियार, गणेश माळी, संतोष कुंभार, बाळू कोळी, पंडित महाजन ,भिका महाजन, छोटू पाटील, इंदुबाई पाटील, धृपदा माळी, अंजनाबाई माधव पाटील, जनाबाई पाटील, किशोर पाटील आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला




No comments:
Post a Comment