Sunday, 20 February 2022

मी म्हारळकर' संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहाने साजरी, महिलांची उपस्थिती लक्षवेधी !!

मी म्हारळकर' संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहाने साजरी, महिलांची उपस्थिती लक्षवेधी !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या म्हारळ गावात'मी म्हारळकर'या सामाजिक, राजकारण विरहित संस्थेच्या वतीने रयतचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती उत्सव मोठ्या उत्साहाने व आंनदी वातावरणात साजरा झाला, यावेळचे वैशिष्ट्ये म्हणजे या सोहळ्यात महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.


कल्याण तालुक्यातील म्हारळ गाव म्हणजे राजकारणाचे सर्वोच्च शिखर म्हटलं जातं. येथील लोकसंख्या लाखाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या पडत आहे. अशातच गावातील राजकारण गावापासून ते मुंबई-दिल्ली पंर्यत पोहोचले आहेत, याचेच बळी अनेक ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे येते काही चांगले घडेल किंवा घडले आहे असे क्वचितच, साहजिकच येथील ग्रामस्थ व नागरीकांचा नकारार्थी विचार सुरू असतानाच गावातील काही तरुण मंडळी व महिलांनी पुढे येवून' मी म्हारळकर' ही सामाजिक संस्था निर्माण केली. राजकारण विरहित, केवळ गावातील नागरिक व ग्रामस्थांच्या पर्यायाने गावाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी याचे कार्य राहणार आहे.


याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती ने करण्यात आली. सर्वाना बरोबर घेऊन जंयती चे रेखीव नियोजन करण्यात आले. प्रथम शुक्रवारी शिवज्योत  प्रस्तावन सोहळा, व शनिवारी शिवप्रतीमा पुजन सोहळा,दुपारी शिवज्योत आगमन सोहळा यामध्ये महिंलानी शिवज्योत चे विधिवत पूजन केले.


सांयकाळी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी भारतीय संस्कृती चे प्रतीकं असलेल्या नऊवारी साडी अशा पोशाख परिधान केल्याने त्या आकर्षणाच्या केंद्र होत्या, मुला मुलीनी या वेळी मिरवणूकीत विविध साहशी प्रात्यक्षिके दाखविली, लेझीम, झांझ पथक, झेंडे यामुळे संपूर्ण म्हारळ गाव भगवेमय झालं होतं. 'जयशिवाजी,जयभवानी' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.


गावाच्या मुख्य प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. येथे अतिशय देखना देखावा तयार करण्यात आला होता. अतिशय चांगल्या व सुंदर वातावरणात हा जंयती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यापुढे गावाच्या भल्यासाठी व विकासासाठी ' मी म्हारळकर' ही संस्था कार्यरत असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...