Tuesday, 1 March 2022

श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे परेल येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी "नमन"चे आयोजन !!

श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे परेल येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी "नमन"चे आयोजन !!                 
                     
मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            कलेचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या "कोकणातील" प्रत्येक कोकणी माणसाला वेड लावणारी, कोकणी कलेचा नावीन्यपूर्ण साज आणि बदलत्या काळानुसार पुरुष पात्रमय नमन कलेत कालपरत्वे बदल होत,"व्यावसायिक "स्त्री-पुरुष" पात्रांनी" नटलेली वैशिष्ट्यपूर्ण लोककला "कोकणचे खेळे-अर्थात नमन" असा सदाबहार कार्यक्रम मुंबईस्थित कोकणी माणसाला शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी मुंबईच्या परेल येथील दामोदर नाट्यगृहात रात्री ८ वाजता कुटुंबसमवेत पहायला मिळणार आहे. कोकण सुपूत्र, कलेच्या प्रवाहात आपली ओळख निर्माण करून, लोककला जतन-संवर्धन करणारे कलावंत शाहीर राजेंद्र कृष्णा टाकले निर्मित आणि गोसावी कृपा नमन कलामंच सोनगिरी प्रस्तुत यांचे "स्त्री-पात्रांनी" नटलेलं नमन ( कोकणचे खेळे ) अशी नाविन्यपूर्ण कलाकृती सादर होणार आहे. पारंपारिक खेळे, भक्तिमय गण, नटखट गवळण सोबत नव्या संल्पनेतून साकारलेली, सध्यस्थीत परिस्थितीवर आधारित सामाजिक संदेश देणारी नाट्य कलाकृती, ( वगनाट्य ) न"मान अंगावर आलाय" प्रेक्षकांची मन जिंकून जाणार आहे. सुंदर नृत्य कलाआविष्कार, उत्तम काव्य रचनेतून साकारलेली नव-नवीन कर्णमधुर आणि सुमधुर गोड आवाजाचे लोकप्रिय शाहीर रविंद्र भेरे सह शाहीर विनेश टाकले, पार्श्‍वगायिका शिवण्या मांडवकर यांच्या मधुर आवाजातून गायली जाणारी गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहेत. कार्यक्रमाचे लेखक/ गीतकार शाहीर राजेंद्र टाकळे, दिग्दर्शक शाहीर प्रविण कुळये, सूत्रधार -संजय मांडवकर, मृदूंग /ढोलकी - विशाल मांजरेकर, ऑर्गन-महेंद्र फटकरे, बेन्जो-सुरज वेले, ऑक्टोपॅड - स्वप्नील गुरव आणि नमन मंडळाचे "पुरुष-महिला" कलाकार यांच्या ताफ्यात हा सदाबहार कार्यक्रम मुंबई रंगभूमीवर मोठ्या जल्लोषात व श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे नेत्रदीपक नियोजनबद्ध आयोजनात कोव्हिड -१९ च्या नियमांनुसार संपन्न होणार आहे. कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी संजय मांडवकर-७२०८६०२१३०/ राजेंद्र टाकले -९५९४६८९५५४/ प्रविण कुळये -९०८२१५४५४१/ प्रदीप गुरव -७६६६६२६८०५/ महेंद्र फटकरे -९६१९६९४९७८/ सुजिंद्र घेवडे -९६५७०१२१७६/सुनील डावल- ७५०६७३४६६५/ सत्या जठयार -९८७०६७२७९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...