टिटवाळ्यात अज्ञात चोरट्याने गाडीचे पंक्चर काढताना गाडीतील 1 कोटी 20 लाखांचे दागिने-रोकड असलेली ब्याग केली लंपास !!
भिवंडी, दिं,६, अरुण पाटील (कोपर) :
मुंबईहून सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी
टिटवाळ्यात आलेल्या एका सोनाराची अज्ञात चोरट्याने एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल सासलेली ब्याग चोरट्याने लंपास केली असून त्या बाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीगत अशी की,कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरात ही घटना घडली असून सोनाराची गाडी रिजन्सी रोडवर पंक्चर झाली होती. त्यामुळे त्याने गाडी बाजूला उभी केली होती. यावेळी गाडीला जॅक लावताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि गाडीतील 2300 ग्रॅम सोनं आणि रोकड असा सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली ब्याग लंपास केली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
मुंबई येथे राहणारे राकेश जैन हे सोन्याचे व्यापारी आहेत. राकेश जैन मंगळवारी आपल्या पुतण्यासह सोन्याच्या दागिन्यांची डिलिव्हरी करण्यासाठी टिटवाळा परिसरात आले होते. त्यांच्या गाडीत एका बॅगेमध्ये चैन, अंगठी, लगड असे एकूण 2300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड होती.
गाडी टिटवाळा मंदिर परिसरातील रिजन्सी रोड येथून जात असताना अचानक पंक्चर झाली. जैन गाडी बाजूला घेऊन जॅक लावत होते. गाडीतून जैन आणि त्यांचा पुतण्या दोघे खाली उतरले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीत ठेवलेली बॅग घेऊन लंपास झाला आहे .
काही वेळाने जैन यांना आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

No comments:
Post a Comment