प्रवासी वाहतूक दारांसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नायडू कॉलनी हायवे सुविधा सेंटरचे लोकार्पण !!
"परिमंडळ ६ चे उपायुक्त देविदास क्षीरसागर यांच्या हस्ते उदघाटन"
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
पूर्व दृतगती मार्गावरील नायडू कॉलनी हायवे जवळ प्रवासी वाहतूक दारांसाठी एन वार्ड महानगर पालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हायवे सुविधा सेंटरचे लोकार्पण परिमंडळ ६ चे उपायुक्त देविदास क्षीरसागर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी घन कचरा व्यवस्थापनच्या उपायुक्त संगीता हसणाळे, सहायक आयुक्त संजय सोनवणे, प्रमुख अभियंता भारत तोरणे, कार्यकारी अभियंता मारुती पवार, अजय पाटणे, सचिन बेलदार, सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते आदी उपस्थित होते.
हायवे मार्गावर अनेकदा प्रवासी वाहतूक दाराना नैसर्गिक विधीसाठी रस्त्याचा कानोसा शोधावा लागतो . वाहतूक दाराना सेवा सुविधा मिळावी या हेतूने आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एन वार्ड महानगर पालिकेच्या वतीने नायडू कॉलनी येथील पूर्व दृतगती मार्गावर हायवे सुविधा सेंटर अर्थात सर्व सुविधा देणारे सुलभ सौचालय सुरू करण्यात आले आहे. हायवे सुविधा सेंटर मध्ये एटीएम सुविधा, वायफाय सुविधा, महिला व पुरुषसाठी शौचालय, स्नान गृह आदी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. आज दिनांक ६ रोजी उपायुक्त देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आल्याचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment