चेंबूर मधील "पंचरत्न" मित्र मंडळतर्फे जिल्हा परिषद शाळा, डिंभे केंद्र पिवळी ता. शहापूर व नेहालपाडा ता. वाडा जि. पालघर, येथे कपाटसह शैक्षणिक साहित्य वाटप तर महिलांना साडी वाटप !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
चेंबूर मधील "पंचरत्न" मित्र मंडळ (रजि.) हे गेली १५ वर्षाहून अधिक कार्यकालात स्वतःच्या कमाईतून निस्वार्थी समाजसेवा करित आहेत. आदिवासी पाडे, खेडेगाव, वनवासी अनाथ आश्रम तसेच शहरी भागातील गरजू, निराधार व विधवा महिलांना वेळोवेळी अन्नधान्य व इतर गरजेच्या वस्तूंचे वाटप करीत असते.
त्यांच्या या समाज कार्याची दखल राज्य तसेच राष्ट्रीय पातळींवर घेतली गेली असून सर्व प्रमुख वृत्तपत्रे तसेच प्रसार माध्यमांनी याची दखल घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर यांनी सांगितले सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या, "पंचरत्न मित्र मंडळातर्फे दि. ३ एप्रिल २०२२ रविवार रोजी जिल्हा परिषद शाळा, डिंभे केंद्र पिवळी, ता. शहापूर व नेहालपाडा ता. वाडा जि. पालघर, येथे १५० हून अधिक गरजू महिलांन साड्यांचे वाटप केले.
शिवाय विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणीक साहित्य, पुस्तके, टेबल, फॅन, लेझीम खाऊ वाटप केले. तसेच एक कपाटही देण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थी व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मोठी मदत झाली असल्याने शालेय संस्थाचालकांनी पंचरत्न मित्र मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. निरंजन सोनक साहेब (महाव्यवस्थापक आरसीएफ) तर विशेष पाहुणे म्हणून श्रीमती कविता शिकतोडे (संचालिका जी के एस कॉलेज), मा. श्री अश्विन कांबळे साहेब (वरिष्ठ प्रबंधक आर सी एफ), मा. श्री विनायक जोशी साहेब (वरिष्ठ प्रबंधक आर सी एफ) इ. सहीत विविध मान्यवर तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड, श्री रमेश पाटील - उपाध्यक्ष, सचिन साळूंखे - खजिनदार, वैभव घरत- सहसचिव, सल्लागार - हनुमंता चव्हाण तसेच मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेतील संचालकांनी पंचरत्न मित्रमंडळाच्या संचालक मंडळाचे व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केले.




No comments:
Post a Comment