कल्याण रेल्वे पोलिसांनी केली मोबाईल चोरांना अटक !!
कल्याण, बातमीदार : कल्याण रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या हातामधील महागडे मोबाईल चोरून पसार होणाऱ्या दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही चोरटे मुंब्रा येथील रहिवासी आहेत. चोरट्यांकडून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. रूस्तम सिद्दीकी (२४), जाहीद अन्सारी (२५) अशी आरोपींची नावे आहेत.आसनगावला जाणारी लोकल कल्याण स्थानकात थांबली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मुंब्रा येथील रुस्तुम सिद्धिकी (24) आणि जाहिर अन्सारी (26) या चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे करत आहेत.

No comments:
Post a Comment