२२ यूट्यूब चॅनेल्सवर देशात बंदी ! यातील ४ चॅनल पाकिस्तानातील !!
बातमीदार : भारताने आज २२ यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. विशेष म्हणजे ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलवरील दर्शकांची संख्या २६० कोटींपेक्षा अधिक होती. ब्लॉक करण्यात आलेल्या चॅनलमध्ये पाकिस्तानातीलही चार आहेत.भारत विरोधी वातावरण निर्मिती केल्यामुळे हे चॅनेल्स बंद करण्यात आले. त्यासाठी आयटी नियम, २०२१ चा वापर करण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण विभागाने दिली. ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलवरील दर्शकांची संख्या २६० कोटींपेक्षा जास्त होती. भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांसारख्या संवेदनशील विषयांवर हे चॅनेल्स सोशल माडियीवर खोट्या बातम्या पसरवत होते. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खोट्या बातम्याही पसरवल्या जात असल्याचा आरोप या यूट्यूब चॅनेल्सवर आहे. त्यासाठी पाकिस्तातील काही वाहिन्यांची मदत घेतली जात होती, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. तसंच युक्रेनमधील सध्यस्थितीवर या भारतीय यूट्यूब चॅनेल्सद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असल्याचंही समोर आलं. अनेक देशांसोबत असलेले भारताचे संबंध बिघडवण्याचा त्यांचा हेतू होता. या वाहिन्यांवरुन भारतविरोधी बातम्याही प्रसारित केल्या जात होत्या, असंही संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं.
1. ARP News
2. AOP News
3. LDC News
4. SarkariBabu
5. SS ZONE Hindi
6. Smart News
7. News23Hindi
8. Online Khabar
9. DP news
10. PKB News
11. KisanTak
12. Borana News
13. Sarkari News Update
14. Bharat Mausam
15. RJ ZONE 6
16. Exam Report
17. Digi Gurukul
18. दिनभर की खबरें
ही ती भारतीय चॅनल आहेत.

No comments:
Post a Comment