आडी केंद्रात शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा !!
कोकण - (दिपक कारकर) :
रायगड जिल्ह्यातील मु. आडी महाड खाडी ता. म्हसळा येथे नुकताच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळा पूर्व तयारी मेळावा उपक्रम राबविण्यात येत आहे.याची पूर्वतयारी होणारा एक नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
सन २०१९ पासून कोविड -१९ या महामारीचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर देखील दिसून आला. येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत काही मुले दाखल होतील. त्यांची शाळा पूर्व तयारी व्यवस्थित होणे आवश्यक आहे. पुढे जाऊन लेखन, वाचन क्रियेत अडथळे येणार नाही. यासाठी या अभियानामुळे विध्यार्थ्यांमध्ये आनंद ,आत्मविश्वास निर्माण होऊन शैक्षणिक, भावनिक, मानसिक व सामाजिक, प्रगती होईल. हा हेतू लक्षात घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. साळी साहेब यांनी मार्गदर्शन करताना शाळा पूर्व तयारी कशी असावी व त्यापासून विध्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याबाबत सांगितले. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.डी.एस. सूर्यवंशी यांनी समाजाच्या माध्यमातून शाळेचा विकास कसा होईल हे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक विजय निमजे सर यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, समाज व शिक्षकाचे एकत्र येणे किती गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. शाळेचे उपशिक्षक श्री रोहिदास गायकवाड यांनी शालेय विद्यार्थी समवेत गीतगायनातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. केंद्रातील अंगणवाडी सेविकांनी गीतगायन व प्रभातफेरीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अमोल पाटील यांनी केंद्रास्तरावर मार्गदर्शन केले. केंद्रातील वसंत बिरादार, प्रदीप बिरादार, गौतम बागलाने, संतोष चव्हाण, बाळू खोटरे, साधन व्यक्ती दीपक पाटील, नंदकुमार जाधव, श्री. बेडके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन चं. भोगल, ग्राम पंचायत सदस्य बाळा शिगवण, शिक्षण प्रेमी संदीप गमरे, आडी महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी आडी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश गु. म्हसकर यांनी शुभेच्छा दिल्या. या स्तुत्य उपक्रमाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment