Friday 29 April 2022

10/ई प्रभागातील तळ +7 मजल्याच्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

10/ई प्रभागातील तळ +7 मजल्याच्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !  


कल्याण, नारायण सुरोशी : मौजे नांदिवली पंचानंद येथील युनियन बॅंक ( मानपाडा रोड ) ते रवि किरण सोसायटी पर्यंत ३०.०० मी डी.पी. रस्त्यामध्ये बाधीत होणा-या,जागामालक सचिन बाबुराव साबळे, बांधकामधारक अविनाश जागुष्टे यांच्या तळ + ७ मजली   आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार "अनधिकृत घोषित" करण्यांत आले होते. त्यामुळे संबंधितांस इमारतीचे अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत पाडून टाकण्यांस फर्माविण्यांत आले होते. तथापी बांधकामधारक अविनाश जागुष्टे यांनी इमारत बांधुन पुर्ण केली होती. हे निदर्शनास आल्यावरून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिनियमातील कलम ३९७ (क) नुसार मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यांत आला होता.


तद्नंतर इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर दि. २१, २२ व २३ मार्च,२०२२ रोजी स्थानिक पोलीस व मनपा पोलीस बंदोबस्तात प्रती दिन ७ ब्रेकर / कॉम्प्रेसरचा वापर करून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तथापी इमारत पूर्णपणे जमिनदोस्त करणे आवश्यक असल्याकारणाने दि. ३१.०३.२०२२ पासुन हायजो क्रशरचा वापर करून इमारत जमिनदोस्त करणेची कारवाई सुरू करण्यात आली. सदर इमारतीच्या तळ + ७ मजली दोन विंगमधील एकुण ८४ सदनिका व १० दुकान गाळयांचे बांधुन पूर्ण झालेले अनधिकृत बांधकाम  भुईसपाट करण्याची कारवाई पुर्ण करण्यात आली आहे. सदर निष्कासन कारवाई दि. ३१.०३.२०२२ ते २८.०४.२०२२ या कालावधीत सार्वजनिक सुटयांचे दिवस वगळता २२ दिवसांत पुर्ण करण्यात आली आहे. इमारतीचा शेवटचा भाग तोडत असतांना बाजुच्या इमारतीमधील रहिवाशांना  आर्थिक/जिवीत हानी होऊ नये याची खबरदारी म्हणुन काही कुटूंबांचा रहिवास खाली करून घेण्यात आला होता.  

सदर इमारत निष्कासनाची कारवाई 10/ई प्रभागाचे सहा. आयुक्त  भारत पवार, उप अभियंता भगतसिंग राजपूत आणि अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिकेचे फेरीवाला पथक कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.


No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...