Wednesday, 20 April 2022

रायते विद्यालयाचे शिक्षक वैभव कल्पेश माधुरी मनोहर शिंदे यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !!

रायते विद्यालयाचे शिक्षक वैभव कल्पेश माधुरी मनोहर शिंदे यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !!


कल्याण, (संजय कांबळे) :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई, या मंडळाचे समन्वयक आणि रायते विभाग हायस्कूल रायते या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक, आणि पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलघर गावच वैभव श्री कल्पेशजी मनोहर शिंदे यांना नाशिक येथे 20 एप्रिल 2022 रोजी, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद  2022 या कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत गुरूगौरव  शिक्षकरत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या कर्तुत्वावर या निमित्ताने लोकमान्यतेची प्रसन्न गौरवमुद्रा उमटली, त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, महाविजेता वस्त्र, देऊन ह्रदयपूर्वक सानंद प्रदान करण्यात आले, प्रगत भारतीय समाज व प्रबळ भारत राष्ट्राचे सदैव चिंतन करणाऱ्या या संस्थेकडून त्यांना भविष्यातील गौरवशाली वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, आपले वर्धमान कर्तृत्व भारतमातेच्या चरणी समर्पित राहो या भावनेने त्यांना हे गौरवपदक समारंभपूर्वक कार्यक्रमात प्रदान करण्यात आले, आणि त्यांच्या या गौरवास्पद कर्तुत्वामुळे, मुंबई बोर्डाच्या, रायते विद्यालयाच्या, बिलघर गावाच्या गौरवशाली इतिहासात मानाचा तुरा त्यांनी रोवला, त्याबद्दल मुंबई बोर्डाचे अध्यक्ष-सचिव, रायते विद्यालयाचे प्राचार्य श्री सी एस पाटील सर आणि विद्यार्थी, वेगवेगळ्या विभागातून, बिलघर गावाकडून त्यांना शुभेच्छारुपी आशीर्वाद  देऊन त्यांना गौरविण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...