Wednesday, 20 April 2022

आर्ट व्हिजन ग्रुपतर्फे भव्य चित्रकला प्रदर्शनचे मुंबईत आयोजन ; अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा !

आर्ट व्हिजन ग्रुपतर्फे भव्य चित्रकला प्रदर्शनचे मुंबईत आयोजन ; अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा !


मुंबई  - ( दिपक कारकर )

उपरोक्त संस्थेच्या वतीने दि.२२, २३ आणि २४ एप्रिल २०२२ वेळ सकाळी ११ वा. ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत (विनामुल्य प्रवेश) ठिकाण पु.ल. देशपांडे कला अकादमी, आर्ट गॅलरी, सिद्धिविनायक मंदिर जवळ, सयानी रोड, प्रभादेवी,मुंबई येथे भव्य चित्रकला प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आर्ट व्हिजन सन २०१२ साली स्थापना झाली असून, या समूहाचे सर्वेसर्वा अर्जुन धाकू माचिवले, महेश कदम व रियाज काझी यांच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा पार पडणार आहे. 


स्वतः कलाध्यापक असून विध्यार्थ्याच्या कलागुणांसोबतच आपल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्रातील निवडक कलाशिक्षकांना एकत्र घेऊन अनेक कला प्रदर्शने केली. अनेक मोठमोठ्या आर्ट गॅलरी मध्ये वैयक्तिकपणे कलाप्रदर्शने करणे शक्य नाही म्हणून ग्रुपने स्वतःचं व्यासपीठ मिळावं म्हणून आर्ट व्हिजन ग्रुपची स्थापना करून, प्रतिवर्षी असे उपक्रम राबवत चित्रकलेच्या प्रवाहात एक वेगळं नाव निर्माण केलं आहे. १० वर्षात १० वे कलाप्रदर्शन करण्यात खूप अत्यानंद होत आहे. महाराष्ट्रातून रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई अशा अनेक खेड्यातून, शहरातून कलाशिक्षक, आर्टिस्ट या कलाप्रदर्शनसाठी भाग घेत आहेत. जगातून सर्व कलारसिक,कलाप्रेमी या कलाप्रदर्शनाचा लाभ घेत असतात. अनेक वृत्तपत्र ,मीडिया दखल घेतात. या प्रदर्शनात थोडा बदल करून कला शिक्षक, आर्टिस्ट व विद्यार्थी काही निवडक शाळा या प्रदर्शनात भाग घेत आहेत. सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था,व्यक्तींना "राजा रवि वर्मा पुरस्कार २०२२" देऊन गौरव करण्यात येणार आहे.


कलाक्षेत्रातील मान्यवर, राजकीय मान्यवर या प्रदर्शनासाठी भेटी देत असतात. काही कंपन्या देखील आपल्या परी मदत करत असतात. कलेचा विकास व्हावा, तळागाळापर्यंत कला पोहोचावी, कलेचा आस्वाद घेता यावा कलाप्रेमी लोक प्रदर्शनातून जास्तीत जास्त चित्रे विकत घ्यावीत, मिळालेल्या रकमेतून योग्य ठिकाणी थोडीफार मदत व्हावी हा उद्देश असतो."न बोलणाऱ्या भिंती बोलत्या व्हाव्या" या उद्देशाने आर्ट व्हिजन समूह कार्य करत आहे.

या भव्य प्रदर्शनाला उदय सामंत ( मंत्री - उच्च,व तंत्र शिक्षण विभाग - महा. राज्य ), जालिंदर सरोदे ( प्रमुख कार्यवाह - शिक्षक भारती महा.राज्य ), अनिल बोरणारे, ( सेक्रेटरी - मुंबई मराठी अध्यापक संघ ), सीमाजी लाड ( आर्टिस्ट/कलाप्रेमी ), सोनाक्षीजी मोरे - ( सरचिटणीस - रेल कामगार सेना,महिला आघाडी ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...