Monday, 9 May 2022

कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा आंबिवली, कल्याण येथे संपन्न !! "नारायण गजानन पाटील यांची ठाणे जिल्हा कोळी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड"

कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा आंबिवली, कल्याण येथे संपन्न !! "नारायण गजानन पाटील यांची ठाणे जिल्हा कोळी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड"


कल्याण, वैष्णवी माळी : ठाणे जिल्हा कोळी समाज यांच्याशी संलग्न असणा-या कल्याण परिसर कोळी समाज यांच्या वतीने समाज कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. आंबिवली येथील कै. गजानन हिरु पाटील विद्यामंदिर येथे सदर मेळावा संपन्न झाला. पंचायत राज मंत्री कपिल पाटील, अखिल भारतीय कोळी समाजाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परेश कांती कोळी, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, अखिल भारतीय कोळी समाज कर्नाटकचे दत्तात्रेय रेड्डी, कोळी समाज महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ कोळी, सचीव अनिल ननावडे, ठाणे जिल्हा कोळी समाजाचे अध्यक्ष जगन हरि सांदन, तसेच मारुती गोटीराम  पाटील, बंडू पाटील, श्रीमती मंगला तांडेल व अन्य मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सत्कारमुर्ती परेश कोळी, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष व कल्याण कोळी समाजाचे अध्यक्ष नारायण गजानन पाटील यांची ठाणे जिल्हा कोळी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोळी बांधवांच्या मोठया उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोळी बांधवांना मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

उमरोळी येथे बौध्दजन पंचायत समिती खरवली विभाग शाखेचा धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम उत्साहात साजरा !!

उमरोळी येथे बौध्दजन पंचायत समिती खरवली विभाग शाखेचा धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम उत्साहात साजरा !!        बोरघर / माणगाव ( विश्व...