Monday, 23 May 2022

२५ मे रोजी KDMC च्या भ्रष्ट, भोंगळ कारभाराविरोधात प्रहारचे मुख्यालयात ठिय्या आंदोलन !!

२५ मे रोजी KDMC च्या भ्रष्ट, भोंगळ कारभाराविरोधात प्रहारचे मुख्यालयात ठिय्या आंदोलन !!


कल्याण, (अण्णा पंडित) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका 'अ' प्रभाग क्षेत्र मोहोने विभागातील गटारांची दुरुस्ती व बांधकाम करण्याकरीता प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने मागील ७-८ महिन्यांपासून पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु कडोंमपा चे बांधकाम विभाग अभियंता सुभाष पाटील नेहमीच महानगरपालिकेकडे निधीच नाही किंवा तुमची फाईल वर पाठवली आहे अशी उडवाउडवीची उत्तरं देउन टाळाटाळ करत आले असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती संघटनेचे कल्याण तालूका सचिव प्रदिप सोनावणे यांनी केला आहे. पुढच्या १५ दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे तरीही पालिकेला अजूनही जाग आलेली नाही. मोहने परिसरातील गटारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ज्यामुळे पावसाळ्यात गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे तसेच सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण ही वाढलेले आहे. यामुळे जर एखाद्या नागरिकाच्या  आरोग्यास हानी पोहचली किंवा दुखापत झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल प्रहार जनशक्ति पक्षाचे कल्याण तालुका सचिव प्रदिप सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.  महानगरपालिकेला जाग आणण्यासाठीच प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक २५ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. आदर्श भालेराव (तालुका संघटक), सिद्धार्थ बोराडे (ग्रामीण अध्यक्ष), कुणाल कांबळे (विभाग प्रमुख), विनोद कांबळे ( संपर्क प्रमुख) यांच्या समवेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात कोळी मॅडम यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यासाबंधित सर्व अधिकाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्याचे कलम ९ आणि कलम १० अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने केली जात आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...