Friday, 24 June 2022

कल्याणमध्ये प्रथमच ‘एसीई हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर सुपर स्पेषालिटी हॉस्पिटल’ !!

कल्याणमध्ये प्रथमच ‘एसीई हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर सुपर स्पेषालिटी हॉस्पिटल’ !!


कल्याण, बातमीदार : ‘एसीई हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर सुपर स्पेषालिटी हॉस्पिटल’ यांचे पहिल्यांदाच कल्याणमध्ये उद्घाटन झाले आहे. माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक सुनिल वायले, डॉ. सुधाकर जगताप, डॉ. कुलदीप महाजन यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठया संख्येने डॉक्टर्स, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. 


कल्याणमध्ये 50 बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. यात सर्व मेडिक्लेम, तसेच राजीव गांधी योजना, जसे गरीब आहेत, त्यांना मदत करण्यासाठी इलाजही यावेळेस येथे करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सर सर्जन डॉ. आदित्य मानके यांच्या संयोजनाने यात राजीव गांधीच्या अंतर्गत कॅन्सरची ट्रिटमेंट आणि केमोथेरपी करण्यात येणार आहे. बायपास सर्जरीसाठी नामांकित डॉक्टर आहेत. तसेच पॅरॅलिसिसचे ॲटॅक अशा पेशंटसाठीही तीन तासाच्या आत आणल्यास त्याला योग्य ट्रीटमेंट देऊन बरे करता येईल. हिंदुजा हॉस्पिटलची देखील टिम आहे. या सर्व टिम कल्याणमध्ये आणलेली आहे. जेणे करुन नागरिकांना सर्व सुविधा एकाच हॉस्पिटलमध्ये मिळतील. तसेच नागरिकांसाठी ओपिडीची व्यवस्था आहे. जनरल मेडिसीन पासून तर गायनिक, ऑप्स, कॅन्सर, इएनडी, अस्थमा, चाईल्डसाठी चांगले स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. 
बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना कमी पैशात चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. 

नागरिक मोठया संख्येने मुंबईत जावून ट्रिटमेंट करतात. ती सुविधा कल्याणमध्ये उपलब्ध करुन असणार आहे. जेणे करुन नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. सध्या धावपळीच्या जीवनात माणसाला हार्ट ॲटॅक आणि पॅरेलिसेसचे ॲटॅक जास्त प्रमाणात येत आहेत. कमी वयातही हे आजार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना या गोष्टींवर कसे मार्गदर्शन करता येईल यासाठी फ्री कॅम्प सोसायटीमध्ये लावून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. जेणेकरुन त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल. तसेच यावेळी डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले की आपली काळजी घ्या. गंभीर आजारापूर्वीच आपली बॉडी चेकअप करा. आमची मदत लागल्यास आम्ही तुम्हाला फ्री कॉस्ट कॅम्प लावू. आमची पूर्ण टीम येऊन आपल्याला मार्गदर्शन व चेकअप करेल. डॉ. सुधाकर जगताप, डॉ. कुलदीप महाजन यांचे मार्गदर्शन तसेच शासन योजना देखील 24 तास नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहेत. कमी पैशात इकडे आलेल्या पेशंटला लवकरात लवकर कसे बरे करता येईल या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहेत. यावेळी मोठया संख्येने नागरिकांनी हॉस्पिटलला भेट दिली.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण.. 

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...