Monday, 6 June 2022

दुरुस्तीचे काम सुरु असताना लिफ्ट कोसळली ! कल्याण येथील घटना !!

दुरुस्तीचे काम सुरु असताना लिफ्ट कोसळली ! कल्याण येथील घटना !!


कल्याण, बातमीदार : कल्याण पश्चिमेतील पुण्योदय स्काय लॉज या बिल्डिंग मधील लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु असताना कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजता घडली.

पुण्योदय स्काय लॉज ही बहुमजली मोठी इमारत आहे. या इमारतीच्या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती सुरु असताना लिफ्ट कोसळली. त्या लिफ्टमध्ये दुरुस्तीचे काम करणारे चार कर्मचारी होती. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज होताच इमारतीच्या सुरक्षा रक्षकासह अन्य नागरीकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली.

लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. चारही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती इमारतीच्या रहिवाशांनी दिली आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...