Monday, 6 June 2022

ठाणे जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा ! जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयाव - जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांचे आवाहन

ठाणे जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा !

जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयाव - जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांचे आवाहन


ठाणे दि.६ (जि.प.) : ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वी अमंलबजावणी करून जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या वतीने 'शिवस्वराज्य' दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती पाटील यांच्या शुभहस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले.


       व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती  श्रेया गायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद सदस्या रेखा कंठे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवस्वराज्य दिनाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून अभिवादन करण्यात आले. यानंतर यावेळी राष्ट्रगीत झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी यावेळी महाराष्ट्र गीत आणि पोवाडे सादर केले.  

      यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

       मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आदी तालुक्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरही शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...