खासगी सावकारी व्यवसाय करण्यासाठी विविध कल्पतृत्या अवलंबल्या जात आहेत. त्यात जमिनीचे विविध प्रकारचे रजिस्ट्रेशन करुन व्याजाने पैसे देणे, एकरकमी पैसे देत दररोज पैसे वसूल करणे, दरमहिना व्याज परतावा मिळवण्यासाठी व्याजाने पैसे देणे असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. हे तथाकथित खासगी सावकार महिना 5 ते 40 टक्के व्याजाने पैसे देतात. परंतु, पोलिसांपर्यंत तक्रार करण्यासाठी जाण्यास कुणीही तयार होत नसल्याने या अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया जमवत आहेत.
अनेकांनी या सावकारी कंटाळून घर सोडले आहे किंवा आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल टाकले आहे. मागील काही वर्षांमध्ये या भागात अवैध सावकारीचे पैसे परत करता येऊ शकत नसल्याने अनेकजण कायमचे फरार झाले आहेत. अनेकांनी व्यवसायासाठी व्याजाने लाखो रुपये घेतले असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामधील बहुतेक जणांनी मुद्दल व व्याज देऊनही खासगी अवैध सावकारांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, जमिनीची खरेदीखते, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात लिहून घेणे अशा घटना घडत आहेत. यामुळे तर काही वर्षांपासून कर्जदार हा सावकारांना कंटाळा, विविध प्रकारच्या युक्ती लढवून जीवनयात्रा संपवून टाकली आहे. परिणामी घेतलेल्या रक्कमेच्या व्याजाचे आकडे फुगत गेले. रक्कम थकल्यास संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. तसेच, मारहाणही केली जाते.
एका सावकाराकडून उसने पैसे घेतले. त्याबदल्यात मी त्यांच्याकडे एक कोरा चेक व एक स्टँप पेपरवर सही करून ठेवला होता. मी व्याजाने एक लाख रुपये घेतले होते, त्याचे व्याज साडे तीन लाख रुपये झाले आहे. त्यातून मित्र परिवारामध्ये बदनामी होत आहे. तसेच, मला गावामध्ये जाता येत नाही.
– एक उद्योजक, हिंजवडी

No comments:
Post a Comment