Monday, 6 June 2022

डॉ. उदय ताम्हणकर लिखित आधुनिक दंतशास्त्र व बरचसं बेसिक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !

डॉ. उदय ताम्हणकर लिखित आधुनिक दंतशास्त्र व बरचसं बेसिक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !


मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :

              मुंबईतील अग्रगण्य दंतशास्त्र चिकित्सक व सिरॅम्को डेंटल क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. उदय ताम्हनकर लिखित आधुनिक दंतशास्त्र व बरचसं बेसिक. या  पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री. विलास पोतनीस, मुंबईचे माजी उपमहापौर श्री.मोहन मिठबांवकर, बोरीवली मधील वैद्यकिय क्षेत्रतील नामवंत डॉ. वसंत खटाव, डॉ. वि. वा. केळकर, डॉ. राजेश घागरे, डॉ. सुधीर पाध्ये, डॉ. व्रजेश शहा, डॉ. राहुल गडकरी,डॉ. परेश नवलकर, डॉ.चेतन पाटील, डॉ. हेमंत ईनामदार इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. डॉ. उदय ताम्हनकर गेली ३८ वर्षे बोरिवली पश्चिम येथे, अत्यंत सचोटी व मेहनतीने दंतशास्त्र हा अतिशय किचकट वाटणारा विषय सोप्या पद्धतीने सोडवून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे ट्रीटमेंट कमी वेळात आणि कमी खर्चात होते. डॉ. ताम्हनकरांवरील रुग्णांचा विश्वास व दवाखान्यातील त्यांचे सहकारी डॉक्टर्स तसेच कर्मचारी वर्गाच्या विनम्र वर्तणुकीमुळेच आज मुंबईच नव्हे तर संपुर्ण भारतामधील सर्वात मोठे दंतवैद्यक शास्त्राचे आधुनिक दालन अशी सिरॅम्को डेंटल क्लिनिक ची ख्याती झाली आहे. असे गौरवोद्गार याप्रसंगी मान्यवरांनी काढले. आधुनिक दंतशास्त्र ह्या पुस्तकामध्ये सर्वसामान्य जनतेला दंतशास्त्रतील नवनविन उपचार पद्धती व त्याचे आपल्या जीवनशैलीत होणारे फायदे ह्याची सोप्या भाषेत माहिती करुन देण्यात आली आहे.हे पुस्तक घरपोच हवे असल्यास : संपर्क : डॉक्टर उदय ताम्हनकर ,बोरिवली (पश्चिम) दूरध्वनी क्रमांक ९८२००३६६९९ यांच्याशी संपर्क साधवा.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...