Monday, 6 June 2022

मुरबाड तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीचे आरक्षण जाहीर !

मुरबाड तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीचे आरक्षण जाहीर !


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असुन, आज मुरबाडचे तहसीलदार संदिप आवारी, यांनी  तालुक्यातील जवळपास 48 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर केले आहे.
              आज आरक्षण जाहीर केलेल्या ग्रामपंचायती मध्ये भोरांडे, मोरोशी, फांगुलगव्हान, खुटल (बा.), वाल्हिवरे, मेर्दी, करचोंडे, शिरोशी, बुरसुंगे, वेळुक, शेलगाव, उमरोली, बु.किसळ, इंदे, सायले, दहिगाव- चाफे, प-हे, धसई, उमरोली खु.महाज, मिल्हे, खेवारे, कळंभाड, भो.एकलहरे, सिंगापूर, पळू, रामपूर, नांदगाव, आंबेळे खु, पवाळे, भालुक, कोळठण, असोळे,साजई, किशोर, सासणे, तोंडली, कान्होळ, साकुर्ली, मोहघर, कोळोशी, खोपिवली, चासोळे, साखरे, वडवली, माळ, वैशाखरे या ग्रामपंचायतींचा समावेश असुन, आजच्या या आरक्षण सोडतीसाठी २४ अधिका-यांच्या नेमणुका करुन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरचे आरक्षण या वेळेत काढण्यात आले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...