Monday, 6 June 2022

कल्याण पंचायत समितीमध्ये शिवराज्यदिन साजरा, आकर्षक सजावटीमुळे पंचायत समितीच्या सौंदर्यात भर !

कल्याण पंचायत समितीमध्ये शिवराज्यदिन साजरा, आकर्षक सजावटीमुळे पंचायत समितीच्या सौंदर्यात भर !


कल्याण, (संजय कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर आखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत, राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषांखूपच्याफंड लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस ६ जून १६७४ म्हणजेच शिराज्यभिषेक दिन होय, भूमिपुत्रांने निर्माण केलेल्या या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधिक द्ढ होण्यासाठी हा दिवस प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेने शिवराज्यदिन साजरा करावा असे शासनाने अवाहन केले होते. त्यानुसार कल्याण पंचायत समितीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शिपाई राहूल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीमुळे पंचायत समिती इमारत अधिक आकर्षक दिसत होती.


६ जून १६७४ हा दिवस हे रयतेचे राज्य शाश्वत चिंरतन, रहावे म्हणून महाराजांनी या दिवशी स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला व शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राज सदरेवरुन घोषित झाले. याच दिवशी शिवशकाची निर्मिती करून  महाराज शककर्ते झाले व शिकशकगणनेला प्रारंभ झाला. तो हा शुभदिन होय, महाराजांनी तत्कालीन प्रस्तापित सत्तांना नामोहरम करून स्वतः च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची ओंजळ सुख समृद्धीने भरली.

हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे, अशा या भूमिपुत्रांच्या स्वांतत्र्यदिनाचे  महत्त्व अधिक द्ढ व व्यापक  होण्यासाठी ६ जून हा दिवस आपल्या ग्रामपंचायतीमध्ये शिवराज्यदिन म्हणून साजरा करावा. सकाळी ९वा पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्यध्वज बांधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंध लिहून त्यावर अक्षता लावून गाठी, आंब्याची डहाळी, बांधून गुढी उभारून अभिवादन करून महाराष्ट्र गीत, आणि राष्ट्रगीत गाउन या कार्यक्रमाला लोकोत्सव स्वरूप प्राप्त करून द्यावे असे अवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते.

त्यानुसार आज कल्याण पंचायत समितीच्या आवारात आकर्षक सजावट करण्यात आली होती, त्या समोर स्वराज्यगुढी उभारण्यात आली होती. ही सगळी सजावट कल्याण पंचायत समितीचे शिपाई राहूल कांबळे व त्यांच्या इतर सहकार्य कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय व मंगलमय झाला होता.

यावेळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, विस्तार अधिकारी श्री हरड, दिनेश घोलप, आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...