Friday, 3 June 2022

दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला प्राचार्य जयवंत सुर्यराव सर यांचा सेवापुर्ती सोहळा !!

दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला प्राचार्य जयवंत सुर्यराव सर यांचा सेवापुर्ती सोहळा !!               


मुरबाड ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील मौजे सायले गावचे सुपुत्र व सिद्धगड विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय डोंगरन्हावे येथे प्राचार्य म्हणुन कार्यरत असलेले जयवंत सुर्यराव सर यांचा सेवापुर्ती समारंभ  सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 


संबंधित सेवापुर्ती समारंभाला केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सभापती स्वराताई चौधरी, जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, आरपीआय अध्यक्ष दिनेश उघडे, माजी सभापती दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, शिवसेनेचे रामभाऊ दळवी, मुरबाड नगरपंचायचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे,  सुहास मोरे, अनिल घरत, तालुका उपाध्यक्ष भास्करशेठ वडवले, नगरसेवक मुकेश विशे, मोहन सासे, अन्य मान्यवरांनी उपस्थित राहुन सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जयवंत सुर्यराव सर यांनी शिक्षकी पेशा सांभाळून भारतीय जनता पक्षाचे काम केले. या पुढे त्यांना पुर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठी वेळ देता येईल. तर आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की तिन्ही बाजू सांभाळणारा कार्यकर्ता म्हणजे जयवंत सूर्यराव सर, आपलं घर परिवार, शाळा तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष पद तेही तिसऱ्यादा चांगल्या प्रकारे त्यानी सेवा केली आहे. संबंधित कार्यक्रमाला विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी जयवंत सुर्यराव सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...