- गाईच्या पोटात प्लास्टीक साचले मलमुत्र नाकातून !
मुरबाड, गोविंद पवार : प्लास्टीक बंदिचा फज्जा उडाल्या ने आज सर्वत्र प्लास्टीकचा कचरा पहावयास मिळत आहे, शहरातील नाले तुंबण्यास खरं कारण हा प्लास्टीक कचरा असून, यात मुखत्वे गारपाणी पिऊन फेकलेल्या बाटल्या पाहिल्यातर हा कचरा वसुंदरेला मारक ठरत आहे, तर हे प्लास्टीक वर्षानु वरसे मातीत विघटन होत नाही व रोजच्या रोज याचा वाढता वापर थांबत नाही, हे प्लास्टीक मनुष्या पेक्षा मुक्या प्राण्याना किती घातक आहे याची कल्पना न केलेली बरी, एका गाईच्या पोटात हा प्लास्टीक कचरा साचल्याने तीची नैसर्गिक शौच प्रक्रिया बंद झाली व तीचे मलमुत्र नाकावाटे होऊ लागल्याने तीला हि वेदना देण्या मागे मनुष्याची निष्क्रीयता जबाबदार म्हणावी लागेल.
दुभती गुर असोत की भाकड शेतकरी उन्हाळ भर मोकाट सोडतात, त्यांच मुख्य अन्न गवत किवा भाताच्या पेंढ्या असलं तरी शेतकरी भाताच्या पेंढ्या पावसाळ्याच्या अन्नासाठी साठवण करून ठेवतात व गवत हे काही दुष्ट लोक पेटवुन देत असल्याने जंगलात अन्न्पाण्याची उपासमार होते म्हणून गुर गावालगतच्या बाजारपेठेतील उकिरड्यावर भुक भागविताना दिसून येतात शेतकरी या पाळीव गुरांना उन्हाळभर उकिरड्यावर पोट भरतात या उकिरड्यावर भाजीपाला विक्रेते असोत की गृहिणी असोत खराब झालेली भाजी प्लास्टीकच्या पिशवित बांधून फेकून देतात हि प्लास्टीक पिशवितील भाजी गुर प्लास्टीक सकट गिळतात व गिळलेल्या प्लास्टीकचे पोटात विघटन न होता ते प्लास्टीक पोटात साचले जाते अशाच प्रकारे धसई बाजार पेठेत उकिरड्यावर पोट भरणा-या गुरा पैकी एका गाईच्या पोटात साचलेल्या प्लास्टीक मुळे तिचं मलमुत्र बंद झाले व ते गेल्या तीच्या नाकातुन येत असल्याने तीच सदैव तोंड हे या मलमुत्राने माखलेले असते, ह्या मुक्या जिवाला वेदना देण्यात मनुष्यच जबाबदार असून या गाईचे मालक एकनाथ गोल्हे या गाईवर उपचार करून तीची या नरकयातनेतुन सुटका करायचा प्रयत्न करतात परंतु पशुवैद्यकिय डाॅक्ट सहमती दर्शवित नसल्याने हि गोमाता मात्र नरकयातना भोगित आहे


No comments:
Post a Comment