Saturday, 4 June 2022

अचुक पावसांचा अंदाज वर्तविणारं शेतक-याच हवामान खातं !!

अचुक पावसांचा अंदाज वर्तविणारं शेतक-याच हवामान खातं !!


मुरबाड, गोविंद पवार : मृग नक्षत्राच्या पावसावर शेतक-यांची शेतीची काम अवलंबून असतात जसं हवामान खातं करोडो रुपयाच्या अधुनिक मशिनी मधून देखील अचुक अंदाज येत नाही तर वर्षानुवर्ष ज्या अंदाजावर शेतकरी शेती करतो तो निसर्गाचा अंदाज मात्र कधीच खोटा होत नाही व चुकत ही नाहीत. 

शेतकरी शेती लागवडी साठी निवडलेल उत्तम बियाण साठवुन ठेवतात व मृगनक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली जाते परंतु हया नक्षत्रांत पेरणी करण्या अंगोदर पाण्याचा अचुक अंदाज निसर्गाकडून पशूपक्षां कडून मिळाल्या शिवाय शेतकरी शेतीची कामे सुरू करीत नाहीत, यात पावसाचा असूक अंदाज देणारे, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहरून येणार बाव्ह्याचं झाड होय. या झाडाला पिवळी फुल येतात ती एवढी असतात की झाडाची पानं दिसतच नाहीत ज्या वेळेस या झाडाला तुरळक फुल येतील त्या वेळेस पाऊस अवेळी व अल्प समजला जातो तर बहरून आला तर मुबलक समजला जातो हा पहिला अंदाज तर मे महिन्यात  जर कावळ्याने गावालगतच्या झाडाच्या मजबुत बेचकी युक्त फांदीवर घरटं घातलं तर वादळीवारा विजा कोसळणे धुवाधार पाऊस होणार आणी जर गावाबाहेरील  झाडाच्या शेंड्यावरील फांटीवर काडकुळ्याचा घरटं बाधलं तर तुरळक सरीचा व कमी पाऊस पडणार हा झाला कावळ्याचा अंदाज, शेतावरील मुंग्यानी वारूळ करताना एक ते दिड इंच केल तर पाऊस कमी पडणार व जर हेच वारून १५-२० इंच करून त्याला तांबड्या मातीनं बाहेरून सारवल्या साऱखं पॅकबंद केलं तर धुव्वाधार पाऊस चार महिने बरसणारच अशाच प्रकारे वाळवीच्या झूंडी निघू लागल्या, पतंगाचे थवे उडताना दिसू लागले, तर पाऊस पडणार हे असुप्त संकेत मिळाले की शेतकरी पेरणीला सुरूवात करतो परंतु या उलट संकेत आले तर बेभरवशाचा पाऊस म्हणून सावध पवित्रा घेत भात पिकासोबत कमी पावसात येणारी नाचणी, वरई, भूईमुग, मक्यांच कणीस या नगदी पिकावर भर देतात व हा शेकडो वर्षाचा अंदाज अद्यावही अचूक असून याच अंदाजावर शेतकरी तरी खरोखरच अवलंबून असून तो कधीच फोल ठरत नाहीच.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...