- शेकडो अदिवासी कुंटूबे लहानमुलांसह शहरी भागातील विटभट्यावर स्थलांतरीत !!
'कार्यसम्राटाच्या' तालुक्यात फक्त रस्त्यांचा विकास ; अदिवासी वाड्या भकास---
मुरबाड, गोविंद पवार: महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून हाकेच्या अंतरावरील मुरबाड तालुका, त्यातच अतिदुर्गम डोंगराळ भाग जो तीन अभयाण्यात मोडला जातेय, या अभयारण्यात येणारी अदिवासी बहूल वस्ती असलेल्या वाड्या पाड्यांना स्वतंत्र्यापासून ते आज पावे तो मुलभूत सुविधा पासून वंचित राहिले आहेत, तर अनेक पिढ्या अज्ञानात गेल्या, अद्यापही पोटाची खळगी भरण्यासाठी येथील अदिवासी शहरी भागातील विटभट्यावर स्थलांतरीत होतात व त्या सोबत लहान लहान बालके जात असल्याने, त्यांचे बालपण ही मातीच्या चिखलात जात असून या आदिवासी वाड्यांची कुपोषणाच्या विळख्यातुन सुटका होत नाहीच.
गेल्या अनेक वर्षा पासून येथील कातकरी व ठाकूर समाज नोव्हेबर महिना उजाडला की शहरी भागातील विटभट्ट्यावर स्थलांतरीत होतात उन्हाळ्याचे आठ महिने केवळ पोटाच्या खळगी साठी वेठबिगारी करीत जून महिना लागला की गावाकडे वळतात व हि कुटुंबांच्या वाडीवस्तीवर कुपोषणाचा विळखा पडतो, कारण लहान वयात झालेली लग्न त्यातच पोषक आहारा अभावी जन्मलेली बालक कुपेषित जन्मतात व पावसाळ्यात सर्वे होताच या कुपेषणाचा उद्रेक समोर येतो परंतु याचं खर कारण म्हणजे येथील कातकरी समाजाला अदिवासीच्या मलभूत सोई सुविधा तर मिळत नाहीतच तर त्यांना मिळणार शासकिय स्वस्त धान्य देखल त्यांच्या चुलीवर न जाता शहापुरातील एका राईसमिलवर जात असल्याने जगण्या जोग साधनच उपलब्ध नषल्याने शेकडो कुंटूब विट भट्टयावर तर काही कुटूंबे लहान बालक माळशेज हायवे वर दिवसभर रानमेवा करवंद, जांभळ, कैरी विकून गुजराण करतात, यांची लहानलहान मुल देखील दिवसभर रानावनातच असल्याने पाटी देखील कोरीच राहते.
या तालुक्याला पंचायत राज मंत्री, लोकप्रतिनिधी, जिप उपाध्यक्ष असे अनेक कार्यसम्राट लाभले असले तरी अदिवासी वाड्यावरील दारिद्र्य व कुपोषणाचा विळखा काही सुटत नाही.


No comments:
Post a Comment