ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी मंदिर पदाधिकाऱ्यांतर्फे गौरव !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. "सारस्वत भुषण" अशोक सराफ यांनी आज (४ जून) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीलाही पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. "विनोदाचा सम्राट" म्हणून ओळखले जाणारे अशोक मामा प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करत श्री शिवाजी मंदिरचे सरचिटणीस श्री. अण्णा सावंत आणि सुहास घाग यांनी "75" वर्षा निमित्त ट्रॉफी आणि शाल भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी मॅनेजर माळकर, प्रमोद घागरे, अविनाश बेलोसे, हरी पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment