Saturday, 4 June 2022

आम आदमी पक्ष डोंबिवली शहार कमिटी तर्फे मोफत स्वास्थ्य शिबिराचे आयोजन !!

आम आदमी पक्ष डोंबिवली शहार कमिटी तर्फे मोफत स्वास्थ्य शिबिराचे आयोजन !!


डोंबिवली, प्रतिनिधी : कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे बऱ्याच जनतेला डायबिटीज तर काही लोकांना हाय बीपीचा त्रास अशा आरोग्य विषयक समस्या सुरू झाल्या, तसेच ह्रदय विकार व अन्य आजार उद्भवले आहेत म्हणून जनतेला सज्ज व सुदृढ ठेवण्यासाठी त्यांच्या स्वास्थ्याच्या विचार करून आम आदमी पार्टी ने आज दि. ५ जून रोजी त्यांच्या डोंबिवली येथील पक्ष कार्यालयात सकाळी ९ ते १ ह्या वेळेत शिबिराचे आयोजन केले.


स्वास्थ्य शिबिराचे आयोजन हे आम आदमी पार्टी डोंबिवली शहर कमिटी आणि Zeno हेल्थ तर्फे आप डोंबीवली पक्ष कार्यालय मध्ये करण्यात आले.


ह्या कार्याचे नियोजन डोंबिवलीतील आम आदमी पक्षाचे नेतृत्व श्री विनोद गुप्ता, सीमा साळी, प्रवीण क़ुर्ले, अक्षरा पटेल, सुनील वेंगुलकर, उदय माने, साठे जी व आम आदमी पक्ष कल्याण- डोंबिवली चे धनंजय जोगदंड, सिद्धार्थ गायकवाड, संदीप नाइक, विनायक मंकिकर, कौस्तुभ देशपांडे, प्रवीण क़ुर्ले, सचिन जोशी, मिथिलेश झा, राजेश शेलार, देव मिश्र, तेजस नाईक, रवी केदारे व अन्य कार्यकर्ते यांनी केले.

डोंबिवली शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून ह्या स्वास्थ्य शिबिराचा लाभ घेतला, तसेच स्वास्थ्य शिबिर आयोजन केल्याबद्दल आम आदमी पक्ष व Zeno हेल्थ यांचे आभार व्यक्त केले व योग्य नियोजनाबद्दल कौतुक केले.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...