Friday, 24 June 2022

बंडखोरांच्या निलंबनासाठी मविआचे "मातोश्री "वर दोन तास बैठक, बंडखोरांवर दबाव वाढवण्याची ठरली रणनीती !

बंडखोरांच्या निलंबनासाठी मविआचे "मातोश्री "वर दोन तास बैठक, बंडखोरांवर दबाव वाढवण्याची ठरली रणनीती !


भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील (कोपर) :
         शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे सरकार अल्प मतात आल्याने व राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर दोन तास एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत सेनेतील बंडखोरी मोडून काढण्याची व बंडखोरांवर दबाव वाढवण्यासाठी रणनिती ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः बैठकीला उपस्थित सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी अधिकच वेगवान होण्याची शक्यता आहे.
         या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, शिवसेना खासदार आमदार अनिल देसाई, विनायक राऊत आदी बडे नेते हजर होते. विधान भवनात बंडखोर आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया कशी पार पाडावी. तसेच सध्याचा राजकीय घटनाक्रम अधिकाधिक दिवस लांबवून शिंदे गटावर दबाव कसा वाढवावा या मुद्यांवर यावेळी सखोल सल्ला मसलत करण्यात आली.
        दोन ते तीन बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्यात यश आल्यास शिंदे गटाला जबर धक्का बसून त्यांच्यावरील दबाव वाढेल असा विचारही या बैठकीत मांडण्यात आला.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...