Thursday, 7 July 2022

ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे - प्रमोद हिंदुराव "कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी 400 कोटी राज्य सरकारने द्यावेत"

ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे - प्रमोद हिंदुराव 

"कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी 400 कोटी राज्य सरकारने द्यावेत"


कल्याण, संदीप शेंडगे : ठाणे जिल्ह्याच्या जलद विकासाकरिता एमएमआरडीए सारखे ठाणे कल्याण प्राधिकरणाची स्थापना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत मागणी केली.


शिंदे सरकार स्थापन होऊन चार दिवस उलटले असून शिंदे सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. 


कल्याण येथील पत्रकार परिषदेत प्रमोद हिंदुराव यांनी ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे कल्याण स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी प्रास्तावित ८०० कोटी पैकी राज्य सरकारने ४०० कोटी निधी उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसह ठाणे जिल्ह्यातील समस्यांचा पाढाच वाचला.

आघाडी सरकारने अनेक प्रकल्प मार्गी लावले असून ते पूर्ण होण्याअगोदरच आघाडी सरकार कोसळल्याने जिल्ह्यातील अनेक महत्त्वाची विकास कामे थांबली आहेत.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे असून ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा तसेच ठाणे जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे असे मत हिंदुराव यांनी व्यक्त केले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील विकास कामांकरिता भरगोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हिंदुराव यांनी केली.

१) ठाणे जिल्ह्याच्या विकासाकरिता मुंबई महानगर प्राधिकरण एमएमआरडीएच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र ठाणे कल्याण प्राधिकरण स्थापन करावे.

२) जिल्ह्याच्या जलद विकासाकरिता इन्फ्रास्ट्रक्चर सामायिक सुविधा,रस्ते, ड्रेनेज,सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, खानकचरा, दळणवळण साधन, वाहतूक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, पार्किंग झोन, मुंबई पाणी पुरवठा प्रकल्पासाठी राज्य सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. यांसह खालील मागण्या पूर्ण करण्याची शिंदे सरकारकडे मागणी करण्यात आली.

३) माझी अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात कल्याण मुरबाड रेल्वे करिता आठशे कोटी निधी प्रास्तावित मंजूर केले होते या मंजूर निधी पैकी चारशे कोटीचा खर्च राज्य सरकारने उचलावा.

४) महिलांच्या हाताला काम व महिलांना रोजगार मिळावा म्हणून कल्याण व मुरबाड तालुक्यातील महिलांसाठी इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक क्षेत्र विकसित करावे.

५) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या आरक्षित जागेवर शासकीय मेडिकल हॉस्पिटल ला तात्काळ मंजुरी द्यावी.

६) ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका व नगरपरिषदा तसेच ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण परिसर याकरिता मुंबई प्रमाणे बेस्ट सेवा एकच वाहतूक प्राधिकरण सेवा उपक्रम सुरू करावा.

७) मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प हा कल्याण पर्यंत प्रस्तावित आहे कल्याण पुढील टिटवाळा बदलापूर ते मुरबाड पर्यंत आहे, तो प्रकल्प पुढे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर टिटवाळा ते मुरबाड पर्यंत वाढविण्यात वाढविण्यात यावा.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यादृष्टीने शिंदे सरकार आणि भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाल्याची पहावयास मिळाली. या पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिदुराव, प्रदेश सचिव प्रसाद महाजन, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत गोंधळी, प्रदेश चिटणीस प्रविण खरात, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सदलगे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष सुरय्या पटेल, माजी नगरसेवक अय्याज मौलवी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...