Saturday 30 July 2022

पालघर जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा भाट्टीपाडा येथे पाहणी दौरा ! --एकनाथ दरोडा यांच्या पाठपुराव्याला यश

पालघर जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा भाट्टीपाडा येथे पाहणी दौरा ! --एकनाथ दरोडा यांच्या पाठपुराव्याला यश 


जव्हार- जितेंद्र मोरघा

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात रस्त्याच्या सुविधा अभावी दरवर्षी चर्चेत असलेला भाटीपाडा या दोनशे ते तिनशे वस्ती असलेल्या पाड्याची बातमी पुन्हा एकदा २३ जुलै रोजी वृत्तपत्र, वृत्तवाहीनी व समाज माध्यम (सोशियल मिडीया) यांत वाऱ्यासारखी पसरली आणि संपुर्ण महाराष्ट्रात भाट्टीपाड्यातील आदिवासींची दयनीय अवस्था उघड झाली व तेथील भयाण वास्तव महाराष्ट्रभर पसरलं. यास्तव पालघर जिल्ह्याचे नव-नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता भाट्टीपाड्याचा पाहणी दौरा केला. 


या वेळी बहुजन विकास आघाडी चे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ जी दरोडा देखील उपस्थीत होते. त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलतांना सांगितले की "आपण वनविभागाकडुन ३(२) चा प्रस्ताव जव्हार गटविकास अधिकारी वाठारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने मंजुर केला असुन त्याकरीता भाट्टीपाडा येथे त्वरीत रस्ता करावा या संबंधी वनविभाग कार्यालय जव्हार यांची परवानगी देखील घेतली आहे. तालुक्यात आपण एकमेव आहोत ज्यांना वनविभागाची परवानगी मिळालेली आहे. परंतु अपुऱ्या निधी अभावी सदर रस्ता करण्यास विलंब होत आहे. तरी सीबादेवी ते वडपाडा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भुस्कुटाचे वाकान ते दखनेपाडा हा जिल्हापरीषद कार्यकारी अभियंता या दोन्ही विभांगानी कुठलाही विलंब न करता त्वरीत पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. व भाट्टीपाड्याच्या ग्रामस्थांची हेळसांड थांबवावी. " अशी दरोडांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली तसेच दरोडा यांनी दोन वर्षापासुन केलेले पाठपुराव्याचे मागिल दैस्ताऐवज आणि वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या विवीध बातम्या सुद्धा जिल्हाधिकारी बोडके यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी एकनाथ दरोडा यांच्या सोबत जगन खानझोडे, उप सरपंच तुकाराम गरेल, झाप व भाट्टीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरोडा यांनी निवेदन दिल्या नंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तात्काळ रस्त्यासाठी प्रयत्न करावा अशा सुचना त्याच्या ताफ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व जिल्हा परीषद बांधकाम विभाग यांना दिल्या. यास्तव या दोन्ही विभागांनी २०२२/२३ च्या विकास आराखड्या रस्ता तयार करणे करीता निधी मंजुरीस पाठवतो असे सांगितले. तसेच भाट्टीपाडा ग्रामस्थांसोबत बोलतांना बोडके यांनी ग्रामस्थांसी संवाद साधला की "तुम्हाला भाट्टीपाडा हे ठिकाण राहण्यास योग्य वाटत नसेल तर तुमच्या म्हणण्या नुसार आपण तुमचे पुनर्वसन देखील करू शकतो. ते लवकरात लवकर व कमी खर्चीक असेल" यावर भाट्टीपाड्याच्या ग्रामस्थांनी विरोध करत "आम्ही शेती सोडुन जाऊ शकत नाही म्हणुन पुनर्वसन ऐवजी आम्हाला त्वरीत रस्ता करून दिला तर योग्य राहील असे मत व्यक्त केले. जिल्हा अधिकारी गोविंद बोडके सोबत जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग, जव्हार तहसिलदार आशा तामखडे, नायब तहसिलदार भला साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी इंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम अभियंता शिंदे साहेब, तलाठी तायडे, बिराजदार, ग्रामसेवक वळवी व झाप पोलिस पाटील देवराम गवारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...