Saturday, 9 July 2022

रोहीणी चे उज्ज्वल यश हे कठीण परिस्थितीतुन -प्रदीप वाघ

रोहीणी चे उज्ज्वल यश हे कठीण परिस्थितीतुन -प्रदीप वाघ


जव्हार, जितेंद्र मोरघा :

पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत किनिस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कु. रोहीणी दिलीप शिंदे हिने चांगले यश संपादन केले असून पालघर जिल्हा मधुन मोजक्या विद्यार्थ्यां मधुन व मोखाडा तालुक्यातील एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

आज आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने कु. रोहीणी शिंदे हिचा सन्मान पत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की हि परीक्षा अंतत्य कठीण असुन, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे त्यामुळे तिचे व शिक्षक व पालकांचे देखील मना पासून आभार मानतो.यावेळी श्री संतोष पाटील सर यांनी देखील रोहीणीस रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली.
या कार्यक्रमास सराई साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विरकर केंद्र प्रमुख, सुरेश हमरे मुख्याध्यापक, मंगेश दाते कार्याध्यक्ष, संजय वाघ सरपंच, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, नंदकुमार वाघ चेअरमन, संतोष पाटील सर, धायगुडे सर, कृष्णा कोथे, मंगल काळे उपाध्यक्षा, आदेश काळे, चंद्रकांत शिंदे, नरेश शिंदे, बांगर सर, फसाळे सर, चव्हाण सर व मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...