टिटवाळा, बातमीदार : भारतीय जनता पार्टी पॅनल क्रं.६ मांडा- टिटवाळा यांच्या वतिने विद्यार्थ्यांना वह्या व नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम शुक्रवार दिनांक ०८ जुलै,२०२२ रोजी सायंकाळी ४ः३० वा. ठाकूरपाडा, टिटवाळा येथे घेण्यात आला.
यावर्षी मांडा पूर्व, पश्चिम व टिटवाळा परिसरात ५ हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री वाटप कार्यक्रमाची सुरुवात ठाकूरपाडा येथून करण्यात आली आहे. यावेळी भाजपा मोहने-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षाताई भोईर, माजी उपमाहापौर बुधाराम सरनोबत, अंजना सरनोबत, समाजसेवक दीपक भाऊ कांबळे, लिना कांबळे, वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे, चंद्रकांत धपाटे सर, माजी सैनिक अध्यक्ष तातेराव फड, माजी सैनिक सुभाष पिसाळ, संजय आढागले, विशाल खिसमतराव, अल्पेश बडेराव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment