केटल बेलच्या स्पर्धेत गौरंग आमडेकर विजेता !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
'केटल बेल' या नव्याने विकसित होणाऱ्या क्रिडा प्रकाराच्या जागतिक स्पर्धेत मुंबईचा गौरंग सुधीर आमडेकर याला विजेतेपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. पोर्तुगाल येथे नुकत्याच झालेल्या जागतिक केटल बेल या स्पर्धेत विविध देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. वजनदार घंटेच्या आकाराची सामुग्री कलात्मक पद्धतीने तसेच नियमानुसार सादर करून कौशल्य दाखविणारा हा क्रिडा प्रकार असून त्याच्या स्पर्धेत गौरंगने बाजी मारली आहे. हिंदुस्थानचे त्याने प्रतिनिधित्व करून चौथा क्रमांक पटकावला आहे. गौरंग हा बोरिवलीच्या चोगले हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून या विक्रमाबद्दल श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाने त्याचे अभिनंदन केले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या या क्रिडा प्रकाराकडे युवकांनी लक्ष द्यावे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपली तयारी असल्याचे विचार गौरंग यांनी अभिनंदनला उत्तर देताना व्यक्त केले.

No comments:
Post a Comment