Friday, 15 July 2022

अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात दहा घरांचे नुकसान, अद्यापही काहीचे पंचनामे नाहीत, तहसील कार्यालयात समन्वयाचा अभाव ?

अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात दहा घरांचे नुकसान, अद्यापही काहीचे पंचनामे नाहीत, तहसील कार्यालयात समन्वयाचा अभाव ?


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात जवळपास १० घरांचे नुकसान झाले असून या नुकसानीबाबतीत कल्याण महसूल विभागाकडून पंचनामे झाले असले तरी अद्यापही नुकसानीचा आकडा कळू शकला नाही तसेच अनेक ठिकाण चे पंचनामे राहिले आहेत, शिवाय या निमित्तानं तहसील कार्यालयातील समन्वयाचा अभाव व सावळागोंधळ समोर आला आहे. त्यामुळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन मधेच भविष्यात "आपत्ती" येवू शकते.


कल्याण तालुक्यात १३ जुलैपर्यंत सुमारे १५८७ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. यामुळे तालुक्यातील उल्हास, बारवी, भातसा आणि काळू या नद्यांना पुर आल्याने काही ठिकाणी नागरिकांंचे नुकसान झाले आहे. तालुक्यात निंबवली, भिसोळ, खडेगोळवली, तिसगाव, कोलवली आदी परिस्थितील सुमारे १० घरांचे नुकसान झाले आहे. भिसोळ येथील बाळाराम कोढीराम हेलम आणि सखुबाई कोढीराम हेलम यांच्या घरांची भिंत कोसळली आहे, तेसेच राया गावातील मुकेश बाबू वाघे यांच्या घराचे छत पडले आहे. याशिवाय आपटी, वावेघर येथे पशुधनाचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामा झाल्याचा दावा महसूल विभाग करत आहे.


परंतु कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोरयानगर येथील ३०/४० कुंटूबियाना घरात पाणी भरल्याने स्थलांतरित व्हावे लागले .याकडे महसूल विभाग फिरकले नाहीत, ते माणसं नाहीत का? कांबा ग्रामपंचायतीने येथील घरांना घरपट्टी दिलेली आहे. येथे २००/२५० च्या आसपास खोल्या आहेत, यामध्ये पाणी देखील भरलेले असताना, महसूल कर्मचारी मात्र यांचे काही नुकसान झालं नाही, असा 'निष्कर्ष, लावून मोकळे 


इतर ठिकाणी देखील परिस्थिती काही वेगळी नाही, राया गावातील मुकेश वाघे यांच्या घरांचा पंचनामा झाला असे निवासी नायब तहसीलदार सांगतात तर येथील ग्रामसेविका अश्विनी यशवंतराव यांनी हा पंचनामा करावा म्हणून कल्याण पंचायत समितीकडे पत्रव्यवहार केली आहे. यावरून आपत्ती काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या मध्ये किती समन्वयक आहे? हे दिसून येते. इतकेच नव्हे तर तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा पाहिला तर यामधील संपर्क साधण्यासाठी दिलेल्या नंबर व त्या अधिका-यांची बदली होऊन आज ४ वर्षे झालीत, शिवाय ते सेवेतून निवृत्त देखील झाले आहेत. यावरून आपत्ती मध्ये किती आपत्ती आहे, कसा भोंगळ कारभार सुरू आहे. हे स्पष्ट होते. हे कमी की काय? तालुक्यात काय, परिस्थिती आहे, किती नुकसान झाले, कुठे काय उपाययोजना केल्या याची माहिती देण्यास देखील  टोलवाटोलवी व एकमेकांना कडे बोट दाखवून 'खांदे,उडवली जातात, ते तर काय करणार म्हणा, कारण त्यांना "मंत्रीच, नाही, कोण विचारतोय, बघू, ?अशाच अर्विभावात ते वागत आहेत.

प्रतिक्रिया..... 

*अभिजित भांडेपाटील (प्रांताधिकारी, कल्याण)

काही ठिकाणी पंचनामे राहिले असल्यास तेथे आमच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब जाण्यास सांगतो,

*डॉ, डि टी खोत (निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी, कल्याण)

माझे नाव अद्याप महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात आहे, हे आश्चर्य वाटलं, माझी बदली २०१८ मध्ये झाली व आता मी निवृत्त देखील झालो आहे, त्यामुळे कल्याण तहसील विभागाने कहरच केला !

No comments:

Post a Comment

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !! ** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस...