Saturday, 9 July 2022

आषाढी एकादशी निमित्त बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी साजरी केली वारकरी दिंडी !

आषाढी एकादशी निमित्त बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी साजरी केली वारकरी दिंडी !


कल्याण, बातमीदार : कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपत ‘देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त’ शनिवार दिनांक 9 जुलै 2022 रोजी सकाळी 8ः30 वाजता बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा ते विठ्ठल मंदिर शिवाजी चौक येथे वारकरी दिंडी काढण्यात आली. यावर्षी दिंडीत बालक मंदिर संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. या दिंडीचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय शिक्षणाधिकारी सरकटे साहेब यांच्या हस्ते झाले. सदर वारकरी दिंडीत 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम यांसारख्या विविध संतांची वेशभूषा केली. संत ज्ञानेश्वरांची पालखी ही वाजत गाजत व विठ्ठल नामाचा जयघोष करत काढण्यात आली. 

पालखीची रंगत वाढली ती वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांमुळे. 
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत होते. 
 त्याचबरोबर ‘झाडे लावा, झाडे जगवा’,  ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ यांसारखे वृक्ष संवर्धनाचे व पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे फलक हातात घेऊन व आरोळ्या देऊन जनजागृती करण्याची सामाजिक कार्यही करत होते. या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालक सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका सौ कल्पना पवार उपस्थित होत्या. तसेच बालक मंदिर संस्थेचे माननीय कार्यवाह डॉक्टर श्री सुश्रुत वैद्य सर व शालेय समिती निमंत्रित सदस्य सौ मुग्धा केळकर आवर्जून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे संस्थेच्या सहकार्यवाह सौ. तेजस्विनी पाठक मॅडम व संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुबोध कुलकर्णी व प्रमुख पाहुण्यांची ओळख व स्वागत मंगेश घाटे यांनी केले. विलास लिखार यांनी सदर दिंडीचे फेसबुकवर प्रक्षेपण केले. शाळेच्या सर्वच शिक्षकांनी दिंडीत अतिशय उत्साहाने भाग घेतला.  बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेने साजरा केलेल्या या संस्कृती संवर्धनासह पर्यावरण जागृतीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे समाजाच्या सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...