समता विद्या मंदिरात ४५० विद्यार्थांची आरोग्य तपासणी !
मुंबई, (शांताराम गुडेकर ) :
सत्कर्म फाऊंडेशन यांच्या माध्यमातून समता विद्या मंदिर येथे ४५० हून अधिक विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी आज पार पडली.
सध्या मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यात पावसाळी आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण देखील मुंबईत आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सत्कर्म फाउंडेशनचे संचालक अनुज नरूला, संचालक दत्तात्रय सावंत यांच्या वतीने दंत चिकित्सक डॉ ओमप्रकाश गजरे, डोळे तपासणी मंगेश आखाडे, डॉ योगेश भालेराव, भाजपाचे रवी गुप्ता, निलेश चव्हाण यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी शाळेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार, मुख्याध्यापक सुदाम वाघमारे, स्मिता सुरवसे आदीसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इयत्ता चौथी ते इयत्ता १० वीतील विद्यार्थांचे दात, डोळे व सर्व साधारण आजर तपासणी करण्यात आली. तर यावेळी विद्यार्थांना आरोग्याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन देखील केले.


No comments:
Post a Comment