Friday 29 July 2022

**मुरबाड मध्ये उज्वल भारत,,उज्वल भविष्य महोत्सव संपन्न ** ** *अम्रुत महोत्सवी वर्षात आदिवासी वाड्या-पाडे मात्र विजेपासुन दुरच ***

**मुरबाड मध्ये उज्वल भारत,,उज्वल  भविष्य महोत्सव संपन्न ** 

** *अम्रुत महोत्सवी वर्षात आदिवासी वाड्या-पाडे मात्र विजेपासुन दुरच ***   


मुरबाड, (मंगल डोंगरे) : येत्या १५ आँगस्ट रोजी देश स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.  त्यानिमित्ताने आज मुरबाड मध्ये "उज्वल भारत, उज्वल भविष्य" या नावाने उर्जा मंत्रालय व उर्जा कंपण्यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील "ओजिवले येथील श्रीसिद्धीविनायक मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये उर्जा कंपण्यांच्या केंद्र शासनाची दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम, सौभाग्य योजना, कुसुम योजना, राज्य शासनाची क्रुषिपंप वीज जोडणी धोरण २०२०, बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर क्रुषिपंप योजना, क्रुषिपंपात उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे जोडणी, इलेक्ट्रीक वाहनांना चार्जिंग सुविधा, या व अशा  विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावीपणे  अंमलबजावणी करुन, शासन व प्रत्यक्षात लाभ घेतलेले लाभार्थी यांच्या कडून माहिती जाणून घेणे, तसेच, आदिवासींच्या जिवनात प्रकाश टाकण्याचा हा खरा कार्यक्रम, पण एकीकडे आदिवासींच्या जिवनात प्रकाश टाकण्याचा सरकार व विजकंपन्या प्रयत्न करत असताना, दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षापर्यंत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या पाडे विजेपासुन वंचित असुन, आदिवासी पाडे अंधारात असल्याची बाब समोर आली आहे. ज्यामध्ये "वाघदगड, धारखिंड, लोत्याची वाडी आणि भट्टीचीवाडी, हि गावे आजही विजेच्या प्रतिक्षेत आहेत.


तालुक्यात महावितरणने राबविलेल्या योजनांची यशस्वी पणे अंमलबजावणी झाली. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील ओजिवले येथिल सिध्दीविनायक मंगल कार्यालयात उर्जा महोत्सवाचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभहस्ते व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी आमदार दिगंबर विशे सर म्हणाले की येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत देश अमृत महोत्सवात पदार्पण करत असला तरी मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाड्या व पाड्यामध्ये अजुन विज पोहोचली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

             या उर्जा महोत्सवात असणाऱ्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी रंगमंच्यातील नृत्याचा आविष्कार सादर करण्यात आला. या प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता, धनंजय आवडेंकर पोस्कोचे बलराम अधिक्षक अभियंता दिलीप ओढे. जि.प.सदस्य, उल्हास बांगर, सुभाष घरत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, यांचेसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना सुरळीतपणे विज पुरवठा करण्यासाठी पारंपारिक उर्जा प्रकल्प राबविण्याची गरज असुन सौरऊर्जा प्रकल्प हा सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नाही. महावितरण नागरिकांना विजपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी मुरबाड तालुक्यात दुर्गम भागात अजून विज पोहोचली नाही. यावेळी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात सुरळीतपणे विजपुरवठा करण्यासाठी केंद्राने सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. तर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लवकरच महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...