मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : आज दुपारी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी व्हिडीओ काँन्फरन्स द्वारे मुरबाड तालुक्यातील पत्रकार व प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते कलकत्त्यावरुन बोलत होते. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी तालुक्यातील अनेक प्रश्न व समस्या उपस्थित केल्या. ज्यामध्ये प्राधान्याने मुरबाड तालुक्यातील मधील बारवी धरण प्रकल्प ग्रस्तांच्या समस्यांमध्ये त्यांचे पुनर्वसन, मुलांना नोक-या, अन्य कामांची थकबाकी मिळणे, तसेच मुरबाड रेल्वेबाबत गेल्या आठ-दहा वर्षांपासून होणार्या घोषणा, व प्रत्यक्षात होणारी दिरंगाई आणि अमंलबजावणी, कल्याण -मुरबाड -नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे थांबलेले काम, प्रस्तावित शाई-काळु धरणाची टांगती तलवार आणि शेतकरी समस्या, याबाबत मंत्री महोदयांच्या प्रतिक्रिया असे एक ना अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. या प्रत्येक प्रश्नांची अचूक आणि योग्य उत्तरे देवुन मंत्री महोदयांनी सर्वांचे शंका निरसन केले. याशिवाय विचारलेल्या समस्यांबाबत त्यांनी केलेल्या उपाय योजना, कार्यप्रणाली व त्या संदर्भात सुरु असलेली कार्यवाही व्यवस्थित पणे समजावून सांगितली. जेणेकरुन मंत्री महोदयांच्या केंद्रीय निधीतून होत असलेले प्रस्तावित प्रकल्प सुद्धा प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय भविष्यातील मुरबाडच्या विकास व त्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजना व आराखडे तयार असून, टप्प्याटप्प्याने उपलब्ध निधी नुसार मुरबाड तालुक्यातील प्रकल्प पुर्ण होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भूमिपुत्राला वाचवायचं असेल, जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. ::- शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे
भूमिपुत्राला वाचवायचं असेल, जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. ::- शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे नऊ तारखेचा गुलाल ह...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment