Thursday, 14 July 2022

भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले ठाणे, भिवंडीतील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास झाला, शिंदे सर्व खात्यांचे कारभारी, त्यामुळे तातडीने खड्डे बुजवावेत !

भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले ठाणे, भिवंडीतील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास झाला, शिंदे सर्व खात्यांचे कारभारी, त्यामुळे तातडीने खड्डे बुजवावेत !


भिवंडी, दिं,१४, अरुण पाटील (कोपर) :
       मुंबईतील खड्ड्यांवरुन भाजपने शिवसेनेला घेरलेले असतानाच असतानाच ठाणे, भिवंडीतील खड्ड्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. छगन भुजबळ म्हणाले, मी नुकताच मुंबईहून नाशिकला आलो. मात्र, ठाणे, भिवंडी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास झाला. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातीलच असल्यामुळे ते तातडीने खड्डे बुजवतील, अशी अपेक्षा आहे.


         छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, जिल्ह्यातील स्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सध्या लोकांना तातडीने मदत करण्याची आहे. पावसामुळे घरे, पिके, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. राज्य सरकारने लोकांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांचा वापर करावा.
         छगन भुजबळ म्हणाले, सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच सर्व खात्यांचा कारभार आहे. एमएमआरडीए प्रशासन, पोलिस विभागही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडीतील खड्डे त्यांनी तातडीने बुजवावेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी. तसेच, रस्त्यावर धिंगाणा घालून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या तरुणांनाही आवर घालावा. ठाणे, भिंवडीतील खड्डे बुजवले नाहीत तर मुंबईहून नाशिककडे येणे अवघड होईल, असा टोला त्यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !! ** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस...