Sunday, 10 July 2022

"स्वराज्य ग्रुप" तर्फे मोफत छत्री वाटप उपक्रम !

"स्वराज्य ग्रुप" तर्फे मोफत छत्री वाटप उपक्रम !       


मुंबई - ( दिपक कारकर ) 

गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकणभूमीपुत्र वैभव राऊत ( संस्थापक/अध्यक्ष - स्वराज्य ग्रुप ) यांच्या "स्वराज्य ग्रुप" तर्फे नुकताच रविवार दि.१० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशी सोहळ्याचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील करंबवणे गावी तेथील ग्रामस्थांना विनामूल्य छत्री वाटप करण्यात आले. 

या गावच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाला स्वराज्य गृपचे सदस्य प्रतीक आयरे, अनंत शिगवण, तसेच गावातील सौ. खळे मॅडम, गावचे सरपंच - कृष्णा शिगवण, हरिश्चंद्र खळे, संजय मोहिते, मनोहर शिगवण आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे गावच्या ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. यापूर्वी देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वैभव राऊत यांनी अनेक उपक्रम राबवत सामाजिक सौख्य राखिले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...