डोंबिवली पूर्वेतील भोपर गावातील रस्त्याची दुरावस्था !
डोंबिवली, बातमीदार : डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवक रवीना माळी यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय.
गेल्या वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आलं होतं. मात्र पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचे नावाखाली रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवलाय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेले नाही . पावसाळ्यात या खड्डेयुक्त रस्त्यांवरुन मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिक देखील त्रस्त आहेत. शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी राजकारण करत असून त्यांच्यामुळेच रस्त्याची दुरावस्था झाल्याचा संदीप माळी यांनी आरोप केले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment