Wednesday, 13 July 2022

जव्हार तालुक्यातील धानोसी- साकुर रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीमुळे पाण्याखाली !

जव्हार तालुक्यातील धानोसी- साकुर रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीमुळे पाण्याखाली !


जव्हार -जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील धानोशी गावाच्या शेजारी असलेल्या मोरी ही दरवर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे पाण्याखाली जाते त्यामुळे पुढे जाणारे १० ते १२ गावांचे साकुर, रामखिंड, कडाची, मेट ,पाथर्डी, डोंगरपाडा, वांगणपाडा, जंगलपाडा, मेडा, शोलेचापाडा, एणा, किड्सा असे अनेक गावांचे संपर्क तुटतात, त्यामुळे सर्व वाहने, बस, जीप बंद होऊन जाते, त्यामुळे नागरिकांना मोठे हाल-त्रास सहन करावे लागते. शाळेत-कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात, एखाद्या पेशंटला इमर्जन्सी गरोदर माता, सर्प, विंचू, असे पेशंट अतिआवश्यक सेवा बंद होऊन जाते, त्यामुळे गावातील सर्वांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व चिंता व्यक्त करत आहेत सतत दरवर्षी पाण्याखाली ही मोरी जात असल्याने वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही मोरीची उंची वाढवून मिळावी ही मागणी करून देखील सरकार लक्ष घालत नाही असे चिंता व्यक्त नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. २ वर्ष झाले धनोशी मोरी बांधून देखील काही उपयोग झाला नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...