Tuesday, 12 July 2022

उल्हास नदी दुथडी, रुंदा पुल पाण्याखाली, आपटी रायता रस्ता पाण्यात तर रायते मानिवली बंद !

उल्हास नदी दुथडी, रुंदा पुल पाण्याखाली, आपटी रायता रस्ता पाण्यात तर रायते मानिवली बंद !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे, टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूंदा पुल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे अम्मू रिसाँर्ट येथे पाणी भरल्याने आपटी रायता रस्ता पाण्यात गेला आहे तर मानिवली रस्त्यारील नाला पुर्ण पणे भरल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे. एकूणच काय तर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे, कल्याण नगर मार्गावरील या नदीवरील रायते पुल कमानीच्या लेवल पर्यंत भरला आहे. परंतु काळू नदीवरील रुंदा येथील पुल सकाळीच पाण्याखाली गेल्याने टिटवाळा ते फळेगाव हा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.


तसेच बारवी आणि उल्हास नदीच्या पाण्यामुळे आपटी रायते रस्त्यावर अम्मू रिसाँर्ट येथे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक मांजर्ली गावाच्या मागिल बाजूने सुरू झाली होती. हा परिसर सखल असल्याने येथे प्रत्येक वर्षी पाणी भरत असते. तर रायते मानिवली रस्त्यावर संत आसाराम बापू आश्रम समोर नाला तुंडूब भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे. येथे काही अतिउत्साही तरुण जीवघेणा स्टंट करत होते. कारण नसताना पुराच्या पाण्यात मस्ती सुरू होती 

या भागात येण्यासाठी घोटस ई,संतेचापाडा किंवा बल्याणी, उंबार्णी, मोहना गेट, या पर्यायी मार्गाचा अवलंब करताना वाहनचालक दिसत होते.

पुरेसा पाऊस पडल्याने तालुक्यातील काही गावामध्ये भातलावणीचे काम देखील सुरू असल्याचे चित्र दृष्टीस पडत होते. या पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ पाडा, वरप, कांबा, पावशेपाडा, पाचवामैल येथील रस्त्याची मात्र पुरती वाईट अवस्था झाली आहे, आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांना, पाटदुखी, मानदुखी आदी मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत, तर मोटारसायकल, सह रिक्षा, ट्रक, आदी वाहने रस्त्यातच बंद पडून ट्राफिक होत आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्या ना सामोरं जावं लागतं आहे मुख्यमंत्र्यांची खड्डे मुक्त ठाणे जिल्ह्याची कल्पना खड्यात पडते की काय?अशी स्थिती आहे.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...