*(निवोशी /गुहागर: उदय दणदणे)*
उत्कर्ष तरुण मंडळ ( धनावडे वाडी ) गाव धामापूर ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी हे मंडळ १९८४ पासून आजतागायत मुंबई सारख्या गजबजलेल्या नगरीत कोकणची बहुप्रिय लोककला नमन आणि शक्ती - तुरा या कोकणातील पारंपारिक लोककला उत्साहाने सादर करीत आहेत.
आपल्या पूर्वजांकडून वारसा मिळालेली ही लोककला रंगभूमीवर पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करत सदर लोककला जोपासण्याचे काम हे मंडळ करत आहे .कार्यक्रमाच्या आयोजनात सात्यता राखणे हे या मंडळाचं आणि हौशी कलाकारांचं खास वैशिष्ट्य आहे.
गेली दोन वर्षे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच सावट आणि त्यात बंद असलेले नाट्यगृह यामुळे रंगमंचावर कोकणातील कोणत्याच लोककला सादर झाल्या नाही.
मात्र पुन्हा त्याच उत्साहात कालाविष्काराच्या सर्वच आघाड्यानी एकमेकांवर कुरघोडी करून रसिकांची अपेक्षा पूर्तता करण्यास सक्षम असलेले कै. वस्ताद तानाजी .- धर्मा यांचे शिष्य *शाहीर : किशोर धनावडे सह गायक- सुनील धनावडे* विरुद्ध कोकणातील प्रख्यात शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य *शाहीर: सुधाकर मास्कर सह- गायक नितीन मास्कर* यांची अफलातून जुगलबंदी "याची देही याची डोळा" अशी शक्ती- तुरा सामन्याची जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक-१५ जुलै २०२२ रोजी रात्रौ ०८-३० वा. दामोदर नाट्यगृह परळ मुबंई येथे करण्यात आले आहे. तरी तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी ९७०२१६१०९४ /८८५००९९०९० / ९९३०५१८०७७ या नंबर संपर्क करावा. असे आवाहन उत्कर्ष तरुण मंडळ ( धनावडे वाडी) मुबंई वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment