कल्याण, बातमीदार : दि.१२ जुलै २०२२ रोजी सुमारे सकाळी ७ वा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या खंबाळपाडा वाहनतळावर "महानगर सफाई कर्मचारी संघाचे" संस्थापक/अध्यक्ष मान.भारतजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या सेक्युअर वन सेक्युरिटी सर्विसेस या कंत्राटदाराला काम बंदचा इशारा दिला असून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला सामोरे जात असताना त्यात केडीएमसी ठेकेदार गेल्या दोन महिन्यापासूनचा पगार आज देतो- उद्या देतो असे खोटे आश्वासन देऊन सुद्धा सफाई कामगार व वाहनचालक यांचे दरमहा पालिकेने ठरवून दिलेले वेतन देत नसल्याकारणाने घाणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत असून त्यांच्या मुला-बाळा सहित कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अपुऱ्या वेतनामुळे आधीच कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने दोन/तीन महिने न होणाऱ्या पगारामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण,खायला अन्न बनवण्यास लागणारे सामान, सिलेंडर, लाईट बिल, घरभाडे इतर कर्ज परतफेड अशा विविध संकटांचा डोंगर होत असल्याने तानतनाव वाढून त्यांची मानसिक हानी होत आहे. अनियमित पगारामुळे त्यांच्या कुटुंबात वादविवाद होत असून रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तरी देखील या सर्व प्रकाराकडे पालिकेचे आयुक्त-विजय सुर्यवंशी तसेच घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त-अतुल पाटील व संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. पावसापाण्यातून घाणीत काम करून सुद्धा कष्टाचा पगार वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिस्थितीला कंटाळून ठेकेदाराला दरमहा पगार होत नसल्याने काम बंदचा इशारा दिला आहे. भर पावसात घाणीचे काम करणाऱ्यांना हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटरी आदी. कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साधन ठेकेदाराकडून मिळत नसून सुद्धा त्यांचे मासिक वेतन सुद्धा वेळेवर मिळत नसेल तर त्यांनी कुटुंबाचे पालन-पोषण कश्या पद्धतीने करायचे हे सर्वात मोठं संकट असून याला जबाबदार कोण? आणि अश्या प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांची हानी आणि त्यांच्या कुटुंबियांची पिळवणूक करणार्यांवर वेळीच कारवाई होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी यांवर केडीएमसीचे आयुक्त-विजय सुर्यवंशी, उपायुक्त-अतुल पाटील व इतर अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून योग्य ती अंमलबजावणी न केल्यास मोठया प्रमाणात आक्रोश आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या दुष्परिणाम यांस सर्वस्वी जबाबदार हे ठेकेदार व केडीएमसीचे तत्सम अधिकारी असतील. असे कर्मचाऱ्यांनी ठामपणे व्यक्त केले.


No comments:
Post a Comment