कल्याण, बातमीदार : दि.१३ जुलै रोजी उपशहर संघटक हरिश्चंद्र सत्यवान पाटील, उपशहर युवासेना अधिकारी संदेश हरिचंद्र पाटील, समाजसेविका रसिका संदेश पाटील यांच्या संयोजनाने प्रभागातील नागरिकांसाठी षिवसेना जनसंपर्क कार्यालय, देवीचा पाडा, सत्यवान चौक येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप षिबिराचे आयोजन करण्यात आले.
गेल्या वर्षीही गुरुपौर्णिमेला साडेनऊशे लोकांना चष्मे वाटप करण्यात आले होते.यावर्षीही पंधराशे नागरिकांना मोफत चश्मे वाटप करण्याचा संकल्प यावेळी केला आहे.
प्रभाग क्रमांक ५१, ५२, ५६ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी नेत्र तपासणी केली. आलेल्या नागरिकांनी संदेश पाटील यांचे आभार व्यक्त केले.संदेश पाटील नेहमीच प्रभागात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असतात. नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
या कार्यक्रमाप्रसंगी उपशहर युवा सेना अधिकारी संदेश हरिचंद्र पाटील, उपशहर संघटक हरिश्चंद्र सत्यवान पाटील, समाजसेविका रसिका संदेश पाटील, रविंद्र शांताराम म्हात्रे , शशिकांत बाबू सकपाळ, प्रताप काशिनाथ शिंदे, रितेश हरिचंद्र पाटील, मंगेश सखाराम तावडे, तुषार गावडे, योगेश टेमगिरी, तुषार ऑप्टिकल यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment