प्रदिप वाघ यांनी आडोशी आरोग्य पथकास भेट देवुन जाणून घेतल्या समस्या !
जव्हार, जितेंद्र मोरघा : तालुक्यातील आडोशी येथे प्रदिप वाघ यांनी भेट देवुन समस्या जाणुन घेतल्या यावेळी आरोग्य अधिकारी यांना समस्या बाबत विचारणा केली असता आता कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची ग्वाही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चत्तर यांनी दिली आहे.
यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की आरोग्य पथकाचे इमारत दुरुस्ती व कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती चे निकृष्ट कमाची चौकशी करावी.तसेच सर्व कर्मचारी यांनी निवासस्थानी मुक्कामी रहाण्याची सुचना केली आहे.
यावेळी तुकाराम पवार यांनी देखील आरोग्य समस्या मांडुन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. या प्रसंगी प्रदीप वाघ, तुकाराम पवार, डॉ भाऊसाहेब चत्तर, राहुल कदम, दिंगबर पाटील, देवचंद जाधव, भाऊ दोरे, नंदकुमार वाघ, पवार सर, मथुरे, नर्स वैशाली पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment