Thursday, 14 July 2022

पुरानंतर भात लावणीच्या कामाला वेग, शाळेच्या सुट्टी मुळे मुलांची शेतीच्या कामात मदत !!

पुरानंतर भात लावणीच्या कामाला वेग, शाळेच्या सुट्टी मुळे मुलांची शेतीच्या कामात मदत !!


कल्याण, (संजय कांबळे) :आज सकाळी उल्हास नदीस आलेल्या पुराचे पाणी ओसरु लागल्याने तालुक्यातील काही गावात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दोन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केल्याने  या मुलांची शेतीच्या कामात मदत घेण्यात आली.


गेल्या दोन तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या नद्यांना पूर आला होता. कल्याण नगर, टिटवाळा, शहापूर, खडवली आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदी, नाले, तुंडूब भरल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी शेतात भरल्याने आज सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर गोवेली ठाकूरपाडा येथे शेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली.


हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला आँरेज अलर्ट चा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख राजेश नार्वेकर यांनी आज आणि उद्या म्हणजे १४,१५ जुलै शाळेला सुट्टी जाहीर केली. त्यामुळे या मुलांची शेतीच्या कामासाठी मदत घेण्यात आली. भात लावणी अगोदर, खनणी, चिखलणी व नंतर भात लावणी सुरू झाली. यावेळी पत्रकार संजय कांबळे यांनी देखील शेतीची सर्व कामे सहका-यांच्या मदतीने केली.

असेच भात लावणीचे चित्र तालुक्यातील इतरही अनेक गावात दिसत होते.

No comments:

Post a Comment

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव ! ** भक्ती , परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम जळगाव, प्रतिन...