Sunday, 10 July 2022

प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज व्हावे प्रदिप वाघ यांचे आवाहन !

प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज व्हावे प्रदिप वाघ यांचे आवाहन !


जव्हार -जितेंद्र मोरघा :

पावसाळा सुरू झाला की, जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी लगबग सुरू होते. पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी यासह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यकच आहे. त्यासाठी विविध यंत्रणा सज्ज असतात. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक जणांना प्रशिक्षण दिले जाते. इतक्यावरच न थांबता आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री तसेच यंत्रणेचा आढावा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याद्वारे घेतला जातो. हवामान खात्याने चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. मोखाडा जव्हार तालुक्यात अति मुसळधार पाऊस सुरु असुन रस्त्सावर झाडे पडणे, दरड कोसळणे, तसेच नाले नदी ओसंडुन वाहत आहेत, त्यामुळे नागरीकांनी अनावश्यक कामे टाळा, शेतकर्‍यांनी नदिपात्रात जाऊ नये, नदि, नाले या पासुन सुरक्षित अंतर ठेवा. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस स्टेशन, तहसिलदार,ग्रामपचायतशी संपर्क साधावा याबाबत तहसीलदार खेंगले यांच्याशी प्रदिप वाघ यांनी चर्चा केली असता तहसीलदार यांनी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...