Monday, 11 July 2022

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा १२ वा वर्धापन दिन व आषाढी एकादशी सोहळा संपन्न !

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा १२ वा वर्धापन दिन व आषाढी एकादशी सोहळा संपन्न ! 


मुंबई, (दिपक कारकर) :

उपरोक्त मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजा व मंडळाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा व आषाढी एकादशी सोहळा रविवार दि.१० जुलै २०२२ रोजी नालासोपारा येथे पार पडला. ह्या सोहळ्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण करीत अनेक भजन मंडळानी, "अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर" करीत आपल्या मंडळाच्या दिंडी सोहळा साई दत्त मंदीर संयुक्त नगर येथे समर्थ कृपा भजन मंडळाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. विशेष दिंडी रिंगण सोहळा करून आम्हा भजन भाविक माऊलींना  पांडुरंगाचा जयघोष नामघोष करीत मुखात माऊली माऊली म्हणत साक्षात साई दत्त मंदीर जणू पंढरपूर झाले, असं भक्तिमय वातावरण पहायला मिळाले.

या सोहळ्यासाठी विशेष दिंडी सोहळा करून समर्थ कृपा भजन मंडळाला मोलाचे सहकार्य श्रद्धा सबुरी भजन, त्रिमूर्ती भजन मंडळ, गुरुमाऊली भजन मंडळ, संतोष अबगुल प्रतिष्ठान, पांडुरंग कृपा मंडळ, ब्रह्मानंद भजन मंडळ, गणेश कृपा भजन मंडळ, ओमकार भजन मंडळ, ओम साई भजन मंडळ, साई श्रद्धा भजन मंडळ, ओम साईराज भजन मंडळ, माऊली कृपा भजन, हेरंब भजन मंडळ, यमोत्री आपर्टमेंट, स्नेहिल सदन सोसायटी, साई दर्शन सोसायटी, पंचरत्न सोसायटी, विश्वस्त साई दत्त मंदीर संयुक्त नगर, शिवसेना विभाग प्रमुख जितेंद्र हजारे साहेब, पत्रकार दिपक कारकर, संतोष अबगुल, यांच्या सर्वांच्या उपस्थितीत व सहकार्याने हा सोहळा आनंदात पार पडला.

ह्या सोहळ्याला श्री समर्थ कृपा भजन मंडळ : संस्थापक- विश्वनाथ बांद्रे ; अध्यक्ष- अरविंद मोरे ; कार्याध्यक्ष- प्रणव लांबाडे ; उपाध्यक्ष -संदीप जोशी ; खजिनदार -जनार्दन शिंदे ; उपखजिनदार -गजानन जोशी ; सचिव -सचिन धाडवे ; सहसचिव -विशाल शिर्के ; सल्लागार - संतोष जांभळे, अविनाश मोडकले, संदीप तावडे, प्रमोद मोरे, जानकी लोहार सर्व मंडळाचे सभासद यांचे मोलाचे योगदान लाभले. या अद्वितीय सोहळ्याचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...